शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर कचरा दिसल्यावर कारवाई करणार - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क केज : ओला व सुका कचरा टाकण्यास कचराकुंड्या नगरपंचायतीने बसवल्या नाहीत. त्यामुळे घरातील कचरा रस्त्यावर टाकला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

केज : ओला व सुका कचरा टाकण्यास कचराकुंड्या नगरपंचायतीने बसवल्या नाहीत. त्यामुळे घरातील कचरा रस्त्यावर टाकला जातो. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच केज नगरपंचायतीचे प्रशासक तथा उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. शहरातील रस्त्यावर घाण अथवा कचरा दिसून आल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. केज नगर पंचायतीने ओला व सुका कचरा टाकण्यासाठी कचराकुंड्या शहरात बसवल्या नसल्याने घरातील व दुकानातील ओला व सुका कचरा टाकण्यास शहरातील लोकांनी रस्त्याची निवड केली आहे. मंगळवार पेठेसह शहरातील रस्त्यावर ठिकठिकाणी रात्रीच्या वेळी कचरा टाकण्यास सुरवात केली. याबाबत ‘लोकमत’ने ‘केजचे मंगळवार पेठ बनले कचरा डेपो’ हे वृत्त २७ जून रोजी प्रसिध्द केले होते. या वृत्ताची दखल केज नगर पंचायतीचे प्रशासक शरद झाडके यांनी गुरुवारी(१ जुलै) रोजी केज नगर पंचायतीत नगर पंचायतीच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसह केज शहरातील कचरा उचलण्याचे टेंडर घेतलेल्या गुत्तेदाराची बैठक घेतली. शहरातील रस्ते कचरामुक्त करण्यासह शहरातील नाल्याची साफसफाई करणे आदीबाबत सूचना त्यांनी केल्या. शहरातील नाल्या व रस्त्यावर कचरा अथवा घाण दिसून आल्यावर कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. शहरातील सर्व प्रभागात स्वच्छता करावी, असेही त्यांनी बैठकीत कर्मचाऱ्यांना सांगितले. घनदाट वृक्ष लागवडीबाबतही त्यांनी नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.

... अचानक भेट देऊन करणार पाहणी

नगर पंचायतीमध्ये कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना शहरातील रस्ते कचरामुक्त करण्यासह नाल्याची साफसफाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मी अचानक केव्हाही भेट देऊन पाहणी करणार आहे. रस्त्यावर घाण आढळून आल्यास कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असेही शरद झाडके यांनी सांगितले.

.... कंत्राटदारास बजावली नोटीस

केज शहरातील नाल्यांतील घाण काढणे, कचरा उचलणे यासाठीचे कंत्राट घेतलेल्या गुत्तेदाराने ७४ कामगार कामावर ठेवणे आवश्यक असताना त्याच्याकडे ५४ कामगार असल्याने आढळून आले आहेत. याबाबत त्यास नोटीस बजावण्यात आली आहे. नगर पंचायतीच्या २४ कायम स्वच्छता कामगारांकडे शहरातील रस्ते सफाईचे काम आहे. -शरद झाडके, केज नगरपंचायत, प्रशासक.