शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

विनयभंगप्रकरणी आरोपीला तीन वर्षे सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:21 IST

बीड : अल्पवयीन मुलीचा विनयंभग केल्याप्रकरणी आरोपी प्रकाश मारुती सानप (रा. पिंपळ्याची वाडी, ता. शिरूर) यास तीन वर्षे ...

बीड : अल्पवयीन मुलीचा विनयंभग केल्याप्रकरणी आरोपी प्रकाश मारुती सानप (रा. पिंपळ्याची वाडी, ता. शिरूर) यास तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा प्रमुख जिल्हा व सत्र न्या. एच.एस. महाजन यांच्या न्यायालयाने सुनावली.

१९ डिसेंबर २०१८ रोजी सायंकाळी शिरूर तालुक्यातील पिंपळ्याची वाडी शिवारातील एका शेतात पीडित अल्पवयीन मुलगी विहिरीवर पाणी शेंदत असताना तिला पाठीमागून मिठी मारून तिचा विनयभंग केला. या घटनेच्या अनुषंगाने पीडित मुलीच्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस ठाण्यात विनयभंग, तसेच कलम ८ बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक एम.आर. काझी यांनी करून आरोपीविरुद्ध दिसून येत असलेल्या सबळ पुराव्याच्या आधारावर न्यायालयात अंतिम दोषारोपपत्र सादर केले होते.

या प्रकरणाची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्या. एच.एस. महाजन यांच्या न्यायालयात झाली. सुनावणीअंती दिसून येत असलल्या सबळ पुराव्याच्या आधारावर न्यायालयाने आरोपीला कलम ८ बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ अंतर्गत दोषी धरून तीन वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त साधा कारावास, अशी शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकारी पक्षाची बाजू सहायक सरकारी वकील एस.व्ही. सुलाखे यांनी मांडली. त्यांना ॲड. हरिहर गर्जे यांनी सहकार्य केले, तर पैरवीचे कामकाज सहायक फौजदार सी.एस. इंगळे यांनी पाहिले.

----------