शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

१९ व्या वर्षी कुस्तीचे २०० आखाडे गाजवले! बीडची मल्ल गौरी मुखेकरला व्हायचंय 'महाराष्ट्र केसरी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 16:13 IST

महिला मल्ल गौरी मुखेकरची 'महाराष्ट्र केसरी' होण्यासाठी यशस्वी वाटचाल.

कडा (ता. आष्टी):कुस्ती हा खेळ आता केवळ पुरुषांपुरता मर्यादित राहिला नसून, महिला मल्लांनीही या मर्दानी खेळात आपली मुसंडी मारली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील करंजी (ता. पाथर्डी) येथील गौरी मुखेकर हे याचे उत्तम उदाहरण आहे. दौलावडगाव येथील कुस्ती आखाड्यात आली असता, गौरीने आपल्या ध्येयाबद्दल आणि प्रवासाबद्दल माहिती दिली.

वडिलांचा वारसा आणि मेहनतीची जोडगौरीचे वडील नामदेव मुखेकर हे स्वतः जिल्हा पातळीवरील नावाजलेले पहिलवान आहेत. वडिलांचा सराव पाहून गौरीला लहानपणापासूनच कुस्तीचे आकर्षण वाटू लागले. सुरुवातीला वडिलांनीच घरी जोर, बैठका आणि कुस्तीचे डावपेच शिकवले. त्यानंतर नेवासा येथील त्रिमुर्ती संकुल आणि कोल्हापूर येथे तिने कुस्तीचे प्रगत धडे गिरवले. तिला राष्ट्रीय प्रशिक्षक संभाजी निकाळजे यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

दोनशे आखाड्यांचा अनुभवगौरीने आतापर्यंत बीड, पुणे, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील विविध भागांत सुमारे २०० मैदानी कुस्ती आखाडे गाजवले आहेत. शैक्षणिक काळात तिने ४ वेळा नॅशनल कुस्ती स्पर्धेत सहभाग घेऊन नेत्रदीपक कामगिरी केली आहे. सध्या ती नेवासा येथे महाविद्यालयाच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे.

"मे महिन्यात हरियाणाचे आव्हान"येत्या मे महिन्यात हरियाणा येथे राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गौरीची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. "महाराष्ट्र केसरीची गदा खांद्यावर घेऊन उच्च पदस्थ अधिकारी होण्याचे माझे स्वप्न आहे," असे गौरीने लोकमतशी बोलताना सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Beed Wrestler Gauri Mukhekar Aims for Maharashtra Kesari Title

Web Summary : Nineteen-year-old Gauri Mukhekar, a wrestler from Beed, has conquered 200 wrestling arenas. Inspired by her father and trained rigorously, she aims to win the Maharashtra Kesari title and compete nationally, aspiring to a high-ranking position.
टॅग्स :BeedबीडWrestlingकुस्ती