शहरं
Join us  
Trending Stories
1
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
2
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
3
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
4
'काम हवं असेल तर तडजोड करावी लागेल!' प्रसिद्ध युट्यूबरच्या पत्नीकडे मागणी; ब्लॅकमेल केल्याचीही माहिती
5
नेपाळमध्ये पंतप्रधान होताच बालेन शाह यांचा 'भारतविरोधी' अवतार! ४५ दिवसांत घेतले ४ मोठे निर्णय
6
Hardik Pandya: हार्दिक पांड्याने आधी अनफॉलो केलं, मग फॉलो केलं; गोंधळावर मुंबई इंडियन्सने दिली प्रतिक्रिया
7
Telangana Accident: स्पोर्ट्स बाईक आणि कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांसह ५ जण ठार!
8
मुख्यमंत्री होताच विजय यांच्या अडचणी वाढल्या! मित्रपक्ष नाराज, पहिल्याच दिवशी सरकारमध्ये अंतर्गत संघर्ष
9
अजबच! SBI च्या एटीएममध्ये सुरू आहे सलून, पैसे काढण्यासाठी येणारे होताहेत अवाक्, नेमका प्रकार काय?
10
'२०२६ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कोसळण्याच्या मार्गावर..,' रॉबर्ट कियोसाकी यांनी दिला आणखी एक मोठा इशारा
11
Google New QR Code: गुगलचा मास्टर प्लॅन! आता QR कोड स्कॅन केल्याशिवाय कोणतीही वेबसाईट उघडणार नाही; पाहा काय आहे नवा नियम
12
एका पेक्षा एक तगड्या खेळाडूंपासून सारं काही होतं, पण...., ही बाब ठरली मुंबईच्या अपयशाचं सर्वात मोठं कारण
13
‘तुम तो ठहरे परदेसी’चे गीतकार जहीर आलम यांचे निधन; शब्दांनी जग जिंकले, पण आयुष्य काढले गरिबीत
14
रात्रभर घराबाहेर खाटेवर झोपला, सकाळी 'पत्नी विष प्यायली' म्हणत रडला; क्रूर पतीचा 'असा' उघड झाला बनाव!
15
Daily Worship: १०० वर्षांचे आयुष्य आणि निरोगी शरीर हवंय? मग रोज सकाळी म्हणा 'हा' प्रभावशाली श्लोक
16
मृत्यूला हरवलं, कॅन्सरशी लढत अद्वैती बनली 'टॉपर'; जिद्द, संघर्षमय यशाच्या प्रवासाचा विद्यार्थ्यांसमोर आदर्श
17
पंतप्रधानांचे 'नो गोल्ड' आवाहन आणि थलपती विजयची 'सुवर्ण' घोषणा; नेमका पेच काय अन् 'सुवर्णमध्य' काय?
18
Nida Khan : ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य
19
क्रेडिट कार्डने पैसे वाचवता येतात का? करा हजारो रुपयांची बचत; कोणते कार्ड नेमके कशासाठी वापरायचे?
20
शनि जयंती आणि शनि अमावस्या २०२६: साडेसाती-ढय्येचा त्रास संपणार! १६ मे रोजी करा 'हे' विशेष उपाय
Daily Top 2Weekly Top 5

एकाच जागी काम करण्यामुळे वाढतो मधुमेहाचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 12:20 IST

कॉम्प्युटरसमोर घालवलेल्या प्रत्येक अतिरिक्त तासाबरोबर मधुमेहाचा धोका 22% वाढतो असा धोक्याचा इशारा संशोधकांनी एका अध्ययनाअंती दिला आहे.

एकाच जागी अधिका काळ बसून राहणे म्हणजे मधुमेहाला खुले आमंत्रणच आहे असे म्हणा ना!  व्यक्ती व्यायाम जरी करत असेल तरीदेखील त्याच्यावरही मधुमेहाची टांगती तलवार तशीच असते. 

तुम्ही व्यायाम जरी करत असले तरीदेखील आॅफिसमध्ये कॉम्प्युटरसमोर घालवलेल्या प्रत्येक अतिरिक्त तासाबरोबर मधुमेहाचा धोका 22% वाढतो असा धोक्याचा इशारा संशोधकांनी एका अध्ययनाअंती दिला आहे. एकाच जागी अधिका काळ बसून राहणे म्हणजे मधुमेहाला खुले आमंत्रणच आहे असे म्हणा ना! या संशोधनातून सार्वजनिक आरोग्य धोरणात आवश्यक आणि योग्य ते बदल करण्यास मदत होणार असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे.

सर्वात आश्चर्याची बाब जी या अध्ययनातून समोर आली ती म्हणजे, व्यक्ती व्यायाम जरी करत असेल तरीदेखील त्याच्यावरही मधुमेहाची टांगती तलवार तशीच असते. नेदरलँडच्या मास्ट्रीक्ट विद्यापीठातील जुलियन वॅन डर बर्ग व सहकाºयांनी बसून काम करण्याचा कालावधी आणि पॅटर्नचा ग्लुकोज पचनाशी असणाºया संबंधांचा अभ्यास केला. सरासरी वय 60 असणाºया 2497 लोकांच्या या स्टडीमध्ये सामावेश करण्यात आला होता. सलग आठ आठवडे दिवसभर त्यांना ‘अ‍ॅक्सेलोमीटर’ घालण्यास लावले.



यावेळी एकाच जागी बसण्याचा काळ, जास्तीत जास्त एकाच जागी बसण्याची वेळी, किती वेळा बे्रक घेतात अशी सगळी माहिती गोळा करण्यात आली. 1395 (56%) लोकांचे ग्लुकोज मेटाबॉलिज्म सामान्य होते, 388 (15%) लोकांना मेटाबॉलिज्ममध्ये त्रास होता तर 714 (29%) लोकांना टाईप-2 मधुमेह होता. इतरांच्या तुलनेत मधुमेह असलेले लोक दिवसातून 26 मिनिटे अधिक काळ एकाच जागी बसलेले असतात.