बदलत्या वातावरणात आणि प्रदुषणामुळे केस गळण्याची समस्या ही सर्वाधिक महिलांना जास्त प्रमाणात जाणवते. अनेक महिला या वेगवेगळे कंपन्याचे शॅम्पू आणि उत्पादनं वापरून थकलेल्या असतात. तरीसुद्धा  हवातसा रिजल्ट मिळत नाही. उलट जास्त पैसे वाया जातात. अनेकदा बाजारातील वेगवेगळी उत्पादनं सुट न झाल्यामुळे  केसांची समस्या अजून वाढत जाते.  काहीजणांना टक्कल सुद्धा पडत असतं तसंच केल खराब होतात, कोंडा होतो, केसांमध्ये पुटकुळ्या येत असतात. किंवा अचानक कधीही खाज येणे ही समस्या उद्भवत असते.

Image result for multani mitti fOR HAIR

तुम्हाला सुद्धा जर अशा प्रकारच्या त्रासाला सामोरं जावं लागतं असेल तर तुम्ही घरच्याघरी जास्त खर्च न करता मुलतानी मातीच्या वापराने लांबसडक चांगले केस मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊया केसांसाठी मुलतानी मातीचा कसा करायचा वापर. मुलतानी माती ही सहज कोणत्याही ठिकाणी तुम्हाला सहज उपलब्ध होऊ शकते.

कसा करायचा वापर

Image result for multani mitti fOR HAIR

केसांसाठी मुलतानी माती लावायची असेल तर रात्री झोपण्यापूर्वी मुलतानी माती पाण्यामध्ये कालवून घेऊन त्याची साधारण घट्ट पेस्ट बनवावी. दुसऱ्या दिवशी सकाळी ही पेस्ट केसांच्या मुळांशी लाऊन चांगली मालिश करावी. त्यानंतर केस स्वच्छ धुवावेत.

केसांचा कोंडा निघून जातो

Image result for multani mitti fOR HAIR

केसांमधे कोंडा होणे ही समस्या सर्वांचीच असते. मुलतानी माती हे कोंडा साठी खूप फायदेशीर आहे. मेथी दाणे पावडर,लिंबाचा रस एकत्र करून केसांना व केस कापडाने बांधा आणि थोड्या वेळाने धुऊन टाका. आठवड्यातून दोनदा केल्याने कोंडा नाहीसा होईल. मुलतानी मातीचा वापर केल्यास केसांमधील कोंडा नाहीसा होण्यास मदत होते. तसेच केस वारंवार धुवूनही तेलकट होत असतील, तर केसांवर मुलतानी मातीचा लेप द्यावा. त्याने केसांमधील अतिरिक्त तेल शोषले जाऊन केसांचा तेलकटपणा कमी होईल. ( हे पण वाचा-केस गळणं थांबवण्यासोबतच अनेक समस्यांसाठी फायदेशीर ठरतं हेअर स्पा, जाणून घ्या कसं)

Image result for multani mitti fOR HAIR

असा तयार करा पॅक

Image result for multani mitti fOR HAIR
४ चमचे मुलतानी माती, 

२ चमचे लिंबाचा रस, 

१ चमचा दही, 

१ चमचा बेकिंग सोडा 

एका बाऊलमध्ये मुलतानी माती घ्या आणि त्यात लिंबाचा रस टाका. हे चांगल्याप्रकारे मिश्रित करा. आता यात दही मिश्रित करा. आता त्यात बेकिंग सोडा टाकून थोडी घट्ट पेस्ट तयार करा. गरज असल्यात यात थोडं पाणी टाका.

मुलतानी मातीचे केसांना फायदे

Image result for multani mitti fOR HAIR(Image credit-first cry paranting)

मुलतानी माती तुमच्या डोक्यावरील तेलाला, चिकटपणाला स्वच्छ करते. याने डॅंड्रफही लगेच दूर होतात. लिंबाच्या रसामध्ये एंटीमायक्रोबिअल गुण असतात, जे डॅंड्रफ दूर करण्यास मदत करतात. तर दह्याने डोक्याच्या त्वचेवरील बॅक्टेरिया दूर केला जातो. याने डोकं खाजवण्याची समस्याही दूर होते. तसेच बेकिंग सोडा डोक्याच्या त्वचेच्या फंगससोबत लढतो. ( हे पण वाचा-मुलतानी मातीच्या वापराने पिंपल्सपासून मिळेल सुटका, चमकदार सुंदर त्वचेसाठी 'हे' खास फेसपॅक)

Web Title: Use of Multani soil is beneficial for the hair growth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.