मुलतानी मातीच्या वापराने पिंपल्सपासून मिळेल सुटका, चमकदार सुंदर त्वचेसाठी 'हे' खास फेसपॅक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2020 03:19 PM2020-01-26T15:19:59+5:302020-01-26T15:34:39+5:30

प्रदूषण आणि केमिकल्सच्या वापरामुळे चेहरा शुष्क आणि कोरडा पडत  असतो.  

Skin benefits of multani clay in beauty | मुलतानी मातीच्या वापराने पिंपल्सपासून मिळेल सुटका, चमकदार सुंदर त्वचेसाठी 'हे' खास फेसपॅक

मुलतानी मातीच्या वापराने पिंपल्सपासून मिळेल सुटका, चमकदार सुंदर त्वचेसाठी 'हे' खास फेसपॅक

Next

प्रदूषण आणि केमिकल्सच्या वापरामुळे चेहरा शुष्क आणि कोरडा पडत असतो. नकळतपणे आपण वेगवेगळया प्रकारच्या क्रिम्सचा वापर त्वचेवर केल्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येत असतात. पिंपल्स मुळे काळे डाग पण पडत असतात. जर तुम्हाला सुद्धा स्किनच्या समस्या सतत उद्भवत असतील आणि इतर उपाय करून सुद्धा चेहरा सुंदर दिसत नसेल तर तुम्ही घरच्याघरी मुलतानी मातीचा वापर करून सुंदर आणि डागरहीत त्वचा मिळवू शकता. 

Image result for beautiful skin(image credit- blooming cosmatics)

मुलतानी मातीचा सर्वात जास्त उपयोग हा कॉस्मेटिक आणि डर्मेटॉलॉजीमध्ये करण्यात येतो. याचे अप्रतिम गुण चेहऱ्यावरील माती, तेल आणि घाण साफ करण्यास उपयोगी आहे.या मातीत मॅग्नेशियम क्लोराईड असते. ज्यामुळे पुटकुळ्या आणि त्वचेवरील डाग कमी होतात. त्वचा तेलकट असेल तर ही माती त्वचेतील अनावश्यक जादा तेल शोषून घेते आणि नवीन पिंपल्स येण्यापासून रोखता येतं. ( हे पण वाचा-केसगळती थांबवण्यासाठी आणि सुंदर केस मिळवण्यासाठी मोहरीच्या तेलाने करा मालिश, जाणून घ्या पद्धत...)

तेलकट त्वचेसाठी उपयुक्त

Image result for multani mitti face pack

मुलतानी मातीचा फेसपॅक  वेगवेगळया प्रकारे तुम्ही तयार करू शकता.त्वचा तेलकट असेल तर मुलतानी माती, गुलाबपाणी आणि चिमूटभर हळद घालून त्याची पातळ पेस्ट करावी आणि चेहरा व मानेवर लावावी. डोळ्याभोवती लावू नये. हा पॅक वाळू द्यावा व नंतर पाण्याचे तोंड स्वच्छ धुवावे. पॅक लावल्यानंतर जास्त बोलू नये अथवा चेहऱ्याची जास्त हालचालही करू नये. ( हे पण वाचा-थंड की गरम....केस धुण्यासाठी कोणतं पाणी चांगलं असतं? )

Related image
त्वचा टाईट करण्यासाठी  फेसपॅक

Related image

तुम्हाला तुमची त्वचा जर टाईट हवी असेल आणि तेलमुक्त राहायला हवी असेल तर दोन चमचे मुलतानी मातीबरोबर दूध आणि चंदन पावडर एका बाऊलमध्ये समान प्रमाणात घ्या आणि त्याची घट्ट पेस्ट बनवा. आता हा फेसपॅक चेहऱ्यावर लाऊन ३० मिनिटं असाच ठेवा आणि थंड पाण्याने धुवा.

कोरड्या त्वचेला मऊ करण्यासाठी फेसपॅक

Related image

मुलतानी माती आणि बदामाचा फेस पॅक त्वचा मऊ बनवते. दोन चमचे मुलतानी मातीमध्ये एक चमचा बदाम कापून घाला आणि मग दुधात मिसळून पेस्ट बनवा. आता हा पॅक चेहऱ्यावर लावा. २०  मिनिटांनंतर थंड पाण्याने तुमचा चेहरा धुवा. तुमचा चेहरा मऊ तर होतोच शिवाय चमकदारदेखील होईल.

Web Title: Skin benefits of multani clay in beauty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.