(image credit- be beautiful)

महिलांना बदलत्या वातावरणात केसांच्या वेगवेगळ्या समस्या जाणवत असतात. त्यासाठी आपण वेगवेगळया प्रकारच्या उपायांचा वापर करून केस गळती कशी थांबवता येईल याचा प्रयत्न करत असतो.  अनेक महिला या पार्लरमध्ये जाऊन हेअस स्पा करत असतात हेअर स्पा केल्याचे फायदे आणि स्पा करताना घ्यायची काळजी यांबद्दल आज आम्ही तुम्हला सांगणार आहोत.  चला तर मग जाणून घेऊया हेअर स्पामुळे केसांना काय फायदे होतात. 

केसांची मुळं बळकट होतात

Image result for hair spa

हेअर स्पाच्या वापराने तुम्ही आपल्या केसांना उद्भवत असलेल्या समस्यांना नियंत्रणात आणू शकता. जर तुमचे केस घट्ट बांधल्यावर किंवा कंगव्याने विंचरत असताना गळत असतील तर हेअर स्पाचा वापर करून तुम्ही आपले केस सुंदर बनवू शकता. कारण हेअर स्पा केल्यामुळे तुमचे केस मुळांपासून मजबूत होत असतात. जर  तुम्ही नियमीत स्वरूपात हेअर स्पा कराल तर तुम्हाला केस गळण्यापासून सुटका मिळू शकते. 

तेलग्रंथी मोकळ्या होतात

Image result for hair spa(image credit-femina)

केसांना निसर्गीकरित्या तेलाचा पुरवठा करण्यासाठी तैलग्रंथी असतात. पण स्काल्पवर धूळ असल्यामुळे याचा त्रास होऊन केसांच्या मृतपेशी सुकतात. त्यामुळे खाज येणे, पुळ्या येणे अशा समस्या उद्भवत असतात. हेअर स्पा  केल्याने  रोम छिद्रांना बंद करून  केसांना खराब होण्यापासून वाचवता येतं. ( हे पण वाचा-थंड की गरम....केस धुण्यासाठी कोणतं पाणी चांगलं असतं? )

रक्तपूरवठा चांगला होतो.

Related image

हेअरस्पा करत असताना केसांच्या मुळांना मसाज मिळत असते.  त्यामुळे रक्तवाहिन्या अधिक चांगल्या पध्दतीने  कार्य करतात. त्यामुळे  केसांची वाढ लवकर होण्यास मदत होते. दैंनंदिन आयुष्य जगत असताना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असतो. त्यामुळे आठवड्यातून एकदा हेअरस्पा केल्यास केस चागंले राहतात. तसंच तणावमुक्त झाल्यासारखे वाटते. कारण केसांना मसाज मिळत असते. ( हे पण वाचा-तुमच्या 'या' चुकांमध्ये केसांना केलेले हायलाईट आणि रंग लगेच निघून केस होतात खराब)

हेअर स्पा करताना घ्यायची काळजी

Related image(image credit-makeupbeauty.com)

यासाठी तुम्ही महिन्यातून एकदा किंवा दोनदा हेअरस्पा करू शकता. त्यापेक्षा अधिकवेळा केल्यास तुमचे केस खराब होण्याची शक्यता असते. तसंच  जर तुम्ही केसांना मेहेंदी किंवा कलर केला असेल तो पुर्णपणे निघू शकतो. हेअर स्पा केल्यानंतर क्रिम पुर्णपणे निघत आहे की नाही याची खात्री करून मगच केस सेट करावेत. 

Web Title: Hair Spa Helps Beneficial for stopping hair loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.