लॉकडाऊनमध्ये पार्लरला सुट्टी? घरच्याघरी बटाटा वापरून मिळवा सुरकुत्या, टॅनिंगपासून सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 11:16 AM2020-03-31T11:16:02+5:302020-03-31T11:17:24+5:30

बटाटा आपल्या स्वयंपाक घरात असतोच बटाट्याचा वापर करून तुम्ही त्वचेवरचं टॅनिंग, काळे डाग काढून टाकू शकता.

Row Potato benefits of skin potato can remove dark circles myb | लॉकडाऊनमध्ये पार्लरला सुट्टी? घरच्याघरी बटाटा वापरून मिळवा सुरकुत्या, टॅनिंगपासून सुटका

लॉकडाऊनमध्ये पार्लरला सुट्टी? घरच्याघरी बटाटा वापरून मिळवा सुरकुत्या, टॅनिंगपासून सुटका

Next

सध्या लॉकडाऊनमुळे सगळ्याच ठिकाणी पार्लर बंद असल्यामुळे अनेकांची चिंता वाढली आहे. लॉकडाऊनच्या काळात घरीचं बसावं लागतयं म्हणून आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यायची याबाबत तुम्हाला प्रश्न पडला असेल. आज आम्ही तुम्हाला खास उपाय सांगणार आहोत. बटाटा आपल्या स्वयंपाक घरात असतोच. बटाट्याचा वापर करून तुम्ही त्वचेवरचं टॅनिंग, काळे डाग काढून टाकू शकता. त्यामुळे तुम्हाला पार्लर बंद असल्याचं टेंशन येणार नाही.  घरात बटाट्याचे वेगवेगळे पदार्थ तयार करून खाताना सौंदर्याच्या दृष्टीने सुद्धा बटाटा फायदेशीर आहे. हे ही लक्षात घ्यायला हवं

काळे डाग काढून टाकण्यासाठी 

बटाट्याच्या सालीला वाटून त्वचेवर काहीवेळ मसाज हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. यामुळे त्वचा साफ होण्यासाठी फायदेशीर ठरत असतं.अर्ध्या बटाट्याच्या रसात  एका अंड्याचा पांढरा भाग मिक्स करून मिश्रण बनवून घ्या. चेहरा आणि मानेवर अर्धा तास लावून ठेवा.  काहीवेळानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवून टाका. त्यामुळे त्वेचवरील डाग निघून जाण्यास मदत होईल.

टॅनिंग घालवण्यासाठी 

बटाट्याची साल काढून तुकड्यांमध्ये कापून घ्या आणि त्यांच्या मदतीने संपूर्ण चेहऱ्यावर ५ ते १० मिनिटांसाठी मालिश करा. असं केल्याने हळूहळू स्किन टोन लाइट होतो. बटाट्याचा रस करून तो रस संपूर्ण त्वचेला लावल्यानंतर सुद्धा टॅनिंग कमी होत असतं. 

असा तयार करा फेसपॅक 

बटाट्यापासून तयार केलेला हा पॅक स्किन ग्लो वाढवण्यासाठी मदत करतो. तसेच हा डाग दूर करण्यासोबतच सूज कमी करण्यासाठीही मदत करतो. हा फेस पॅक तयार करण्यासाठी बटाट्याती साल न काढता पेस्ट तयार करा. त्यामध्ये ३  ते ४ चमचे मुलतानी माती आणि काही थेंब गुलाबाचे पाणी एकत्र करा. तयार पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा आणि ३० मिनिटांनतर चेहरा धुवून टाका. हा फेस पॅक काही दिवस नियमितपणे लावल्याने स्किन ग्लो करण्यास मदत होईल.

एक मोठा चमचा बटाट्याची पेस्ट तयार करा. यामध्ये एक मोठा चमचा दही एकत्र करा. तयार पेस्ट जवळपास अर्धा तासासाठी तशीच ठेवा. त्यानंतर ही पेस्ट चेहऱ्यावर अप्लाय करा. ही पेस्ट स्किन ग्लो करण्यासोबतच टाइट करण्यासाठीही मदत करते. 

बटाटा आणि हळदीच्या फेस पॅकचा नियमितपणे वापर केल्याने स्किन टोन आणि रंग लाइट होतो. अर्धा बटाटा किसून घ्या आणि त्यामध्ये एक चिमूटभर कॉस्‍मेटिक हळद एकत्र करा. त्यानंतर तयार पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा आणि अर्धा तासानंतर स्वच्छ करा. 

Web Title: Row Potato benefits of skin potato can remove dark circles myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.