शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळ्यात रुक्ष त्वचेला बनवा मुलायम..

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2016 16:47 IST

हिवाळ्यात वातावरणाच्या बदलाचा परिणाम शरीरावर होऊन त्वचा रुक्ष होण्याची समस्या लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच भेडसावते. थंडीचा जास्त परिणाम हा त्वचेवर होत असून त्वचा रखरखीत बनते.

 -Ravindra Moreहिवाळ्यात वातावरणाच्या बदलाचा परिणाम शरीरावर होऊन त्वचा रुक्ष होण्याची समस्या लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच भेडसावते. थंडीचा जास्त परिणाम हा त्वचेवर होत असून त्वचा रखरखीत बनते. त्यामुळे आपले सौंदर्य नक्कीच खालावते. आजच्या सदरात रुक्ष त्वचेला मुलायम बनवून सौंंदर्य कसे टिकवाल याबाबत जाणून घेऊया...हिवाळ्यातील गार हवा आपल्या चेहऱ्यावरचे तेज गायब करते. त्यामुळे आपली त्वचा रुक्ष आणि निस्तेज दिसू लागते. कित्येक जणांच्या त्वचेला तर तडे पडून त्यातून रक्त निघू लागते. अशा परिस्थितीत आपण मॉयश्चरायजरसोबतच फेस आॅइलचा वापर करु शकता. यामुळे गार हवेतही आपले सौंदर्य टिकून राहील. या शिवाय आपण काही सोप्या टिप्सचा उपयोग करुन हिवाळयातही सुंदर दिसू शकता. हिवाळ्यात आपली त्वचा रुक्ष होत असल्याने दिवसातून दोन वेळा मॉयश्चरायजर करावे, मात्र याचे प्रमाण जास्त नको, कारण यामुळे आपली त्वचा तैलीय आणि काळसर दिसू लागेल. क्रीम बेस्ड जेलदेखील प्रत्येक प्रकारच्या त्वचेसाठी एक चांगला पर्याय होऊ शकतो. याशिवाय आपण बायो आॅइलचाही वापर करु शकता, कारण हे आॅइल नुसतेच एंटी-एजिंगसाठी मदत नाही करत तर आपल्या त्वचेलादेखील पोषण प्रदान करते. शिवाय आपल्या त्वचेत एक सुरक्षात्मक लेयर बनविते ज्यामुळे त्वचा मुलायम बनते. जास्त गरम पाण्याने आंघोळ नकोगरम पाण्याने आपल्या शरीरातील नैसर्गिक आॅइलला नष्ट करते, आणि आपली त्वचा अगोदरपासूनच कोरडी असेल तर आपल्यासाठी गरम पाण्याने आंघोळ करणे खूप नुकसानकारक होऊ शकते. यामुळे हिवाळ्यात जास्त गरम पाण्याने आंघोळ करण्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करा.  डायटमध्ये करा विटॅमिन्सचा वापरसुंदर, ग्लोइंग आणि मुलायम त्वचा हवी असल्यास डायटमध्ये विटॅमिन्सचा वापर करू शकता. त्यात ग्लोइंग स्कीनसाठी ओमेगा ३ चे प्रमाण आहारात वाढवा. ऋतुनूसार भाजीपाला आपल्या त्वचेसाठी उत्तम आहे. रुक्ष आणि साखरयुक्त खाद्यपदार्थ खाण्याचे टाळावे, कारण यामुळे त्वचेला नुकसान होते. आपली त्वचा अगोदरपासूनच कोरडी असेल तर हिवाळ्यात ही समस्या आणखीनच वाढते सोबतच शरीरात रेडनेस देखील येते. यापासून बचावासाठी ओटमील किंवा कॉफी पाउडरला क्रीममध्ये मिक्स करून लावा. यामुळे आपल्या त्वचेतील रुक्षपणा कमी होऊन मुलायम होण्यास मदत होईल.