शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
2
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
3
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
4
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
5
Latest Marathi News LIVE: LIVE: नाशिक TCS प्रकरण: शाहरूख कुरेशी, रझा मेमनला ५ दिवसांची पोलीस कोठडी
6
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
7
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
8
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनेल का विजय थलपती?
9
विजयला मदत करू शकत होता ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...
10
काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन
11
नवी ७-सीटर इलेक्ट्रिक SUV Lexus 'TZ' लाँच; ५३० किमी रेंज, अवघ्या ३५ मिनिटांत होणार चार्ज! बघा फीचर्स
12
"आम्हाला काँग्रेसपासून वेगळं बसवा"; कनिमोझींचं थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र; तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप
13
विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
14
"लोकशाहीची चिंता करू नका, उबाठा गटच अखेरचा श्वास घेतोय"; राऊतांना भाजपचं सणसणीत प्रत्युत्तर
15
भीषण पाणीटंचाई! तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास, कडाक्याच्या उन्हात रोज ३ किमीची पायपीट
16
Gold Silver Rate Today: सोनं २७०० रुपयांनी तर चांदी १०९०० रुपयांपेक्षा अधिकनं महागलं; पटापट चेक कर आजचा लेटेस्ट रेट
17
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
18
स्वप्न शास्त्र: श्रीमंत व्हायचंय? मग स्वप्नात दिसलेल्या 'या' गोष्टी कोणालाही सांगू नका 
19
पहिल्याच दिवशी २०० रुपयांच्या पार पोहोचला 'हा' शेअर; घसरत्या बाजारातही धमाकेदार एन्ट्री, कोणता आहे स्टॉक?
20
Lord Shiva Temple Demolished: तेलंगणामध्ये शाळेसाठी ८०० वर्षे जुने शिवमंदिर पाडलं, नागरिकांमध्ये संतापाची लाट!
Daily Top 2Weekly Top 5

... हे तर ‘हार्टअटॅक’ला निमंत्रण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2016 20:09 IST

एकाच ठिकाणी अधिक बसल्याने हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो.

एकाच जागी खूप वेळ बसणे आपल्या आरोग्यासाठी खूप धोकादायक ठरू शकते. एका नव्या रिसर्चनुसार, एकाच ठिकाणी अधिक बसल्याने हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो.

त्यामुळे आॅफिसमध्ये थोड्या थोड्या अंतराने उठून थोडे फिरून येण्याचा सल्ला संशोधक देत आहेत. एका जागी बसल्याने हृदयाला रक्तपुरवठा करणाºया वाहिनीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण वाढून हार्टअटॅक येण्याची शक्यता जास्त असते.

युनिव्हर्सिटी आॅफ टेक्सास साऊथवेस्टर्न मेडिकल सेंटर येथील प्रमुख संशोधक अमित खेरा यांनी माहिती दिली की, एकाच जागी बसण्यामुळे हृदयात अ‍ॅथेरॉस्क्लेरोसिस तयार होते हे सिद्ध करणारे आमचे पहिलेच संशोधन आहे.

एकाच जागी बसण्याच्या कालावधीमध्ये दर एका तासाच्या वाढीबरोबर रक्तवाहिनीत कॅल्शियम साचण्याचे प्रमाण 12 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता असते. याचाच अर्थ की, रोज आपला एकाच जागी बसण्याचा कालावधी एक-दोन तास कमी करू शकलो तर हृदयाच्या आरोग्यासाठी ते फार लाभदायक ठरू शकते.

या संशोधनामध्ये सुमारे दोन हजार लोकांच्या शारीरिक हालचालींवर एका मशाीनद्वारे सात दिवस नजर ठेवण्यात आली. त्यातून असे दिसून आले की लोक दिवसातून सरासरी 5.1 तास एकाच जागी बसून असतात. एवढा वेळ कोणतीही शारीरिक हालचाल न करता बसणे म्हणजे हार्टअटॅकला निमंत्रण देण्यासारखेच आहे.