डिओ, परफ्यूम वापरूनही घामाची दुर्गंधी जात नाही? ५ रूपयांची तुरटी करेल दुर्गंधीचा नायनाट, पाहा कसा कराल वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 14:47 IST2026-04-22T14:47:25+5:302026-04-22T14:47:48+5:30

Body Odor - Alum : आपण घामाची दुर्गंधी दूर करण्यासाठी तुरटीचा वापर करू शकता. कारण तुरटीमध्ये अँटी-बॅक्टेरिअल गुण असतात, जे दुर्गंधी निर्माण करणारे बॅक्टेरिया नष्ट करतात.

How to use alum to prevent body odour, know ite other benefits | डिओ, परफ्यूम वापरूनही घामाची दुर्गंधी जात नाही? ५ रूपयांची तुरटी करेल दुर्गंधीचा नायनाट, पाहा कसा कराल वापर

डिओ, परफ्यूम वापरूनही घामाची दुर्गंधी जात नाही? ५ रूपयांची तुरटी करेल दुर्गंधीचा नायनाट, पाहा कसा कराल वापर

Body Odor - Alum : उन्हाळ्यात इतर दिवसांपेक्षा जास्त घाम येणं नॉर्मल आहे. घराबाहेर पडले की, घामाच्या धारा लागतात आणि कपडे घामाचे चिंब भिजतात. या दिवसांमध्ये सगळ्यात जास्त त्रास होतो तो घामाच्या दुर्गंधीचा. घामाच्या दुर्गंधीने आपल्याला त्रास तर होतोच, सोबतच आपल्या आजूबाजूच्या लोकांना सुद्धा होतो. काही लोकांच्या घामाची दुर्गंधी तर इतकी येते की, लोक आपल्यापासून दूर पळू लागतात. अशात लोक ही समस्या दूर करण्यासाठी डीओड्रंट किंवा परफ्यूमचा अधिक करतात. पण यांचाही प्रभाव जास्त वेळ टिकून राहत नाही. अशात आपण घामाची दुर्गंधी दूर करण्यासाठी तुरटीचा वापर करू शकता. कारण तुरटीमध्ये अँटी-बॅक्टेरिअल गुण असतात, जे दुर्गंधी निर्माण करणारे बॅक्टेरिया नष्ट करतात. ही समस्या दूर करण्यासाठी तुरटीचा वापर कसा करावा हे जाणून घेऊयात.

कसा कराल वापर?

आपल्याला जर डीओड्रंट वापरायचं नसेल, परफ्यूम वापरायचं नसेल तर आंघोळ केल्यावर तुरटी लावू शकता. तुरटीचा तुकडा थोडा पाण्यात भिजवून काखेत, पायांवर आणि शरीरावर जास्त घाम येणाऱ्या जागेंवर फिरवू शकता. तुरटीने दुर्गंधी निर्माण करणारे बॅक्टेरिया नष्ट होतात. महत्वाची बाब म्हणजे याने त्वचेचं काही नुकसानही होत नाही. हा एक नॅचरल उपाय ठरतो.

एक ग्लास पाण्यात थोडी तुरटी पावडर टाका. नंतर कापसाच्या मदतीने तुरटीचं पाणी घाम जास्त येणाऱ्या भागांवर लावा. इतकंच नाही तर आपण तुरटीच्या स्प्रे चा देखील वापर करू शकता. तुरटीचं पाणी काखेत स्प्रे करा. हे एखाद्या नॅचरल डिओड्रंटसारखं काम करतं. 

पायांची दुर्गंधी होईल दूर

उन्हाळ्यात शूज घालून येणाऱ्या घामाने पायांची सुद्धा दुर्गंधी येते. ही समस्या दूर करण्यासाठी सुद्धा आपण तुरटीचा वापर करू शकता. कोमट पाण्यात तुरटी फिरवा आणि या पाण्यात १० ते १५ मिनिटे पाय ठेवू बसा. असं केल्याने दुर्गंधी निर्माण करणारे बॅक्टेरिया नष्ट होतात आणि पायांचा वासही दूर होतो.  

सोबतच तुरटीचे त्वचेला अनेक फायदेही मिळतात. तुरटीने त्वचा मुलायम होते, चमकदार होते. इतकंच नाही तर त्वचेतील धूळ-मातीही साफ होते. तसेच तुरटी एका नॅचरल अँटिसेप्टिकसारखं काम करते. ज्यामुळे काही जखम झाली असेल तरी ती लगेच भरून निघते. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे तुरटीसाठी जास्त पैसेही खर्च करावे लागणार नाहीत. बाजारात १० रूपयात तुरटी सहजपणे मिळते.

Web Title: How to use alum to prevent body odour, know ite other benefits