दाढीवाल्या लूकने पुरूषांना आकर्षक असल्याची जाणीव होते का? पाहा याबाबत सायन्स काय सांगतं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 15:09 IST2026-04-16T15:07:47+5:302026-04-16T15:09:14+5:30

Beard Look Benefits : एका रिसर्चमधून समोर आलंय की, दाढी ठेवणाऱ्या पुरूषांची विश्वसनीयता वाढते. बिअर्ड आणि पुरूषार्थ यांच्यात एक मनोवैज्ञानिक संबंध देखील आहे, जो मुळात पुरूषांच्या आक्रामकतेशी संबंधित आहे. 

Does a beard make men feel more attractive? See what science says | दाढीवाल्या लूकने पुरूषांना आकर्षक असल्याची जाणीव होते का? पाहा याबाबत सायन्स काय सांगतं

दाढीवाल्या लूकने पुरूषांना आकर्षक असल्याची जाणीव होते का? पाहा याबाबत सायन्स काय सांगतं

Beard Look Benefits : बिअर्ड लूक ठेवण्याचा ट्रेंड अलिकडे चांगलाच वाढलाय. तरूणांसोबतच मध्यम वयांचे पुरूष देखील बिअर्ड लूक ठेवण्यावर भर देतात. पण दाढीवाला लूक ठेवण्याआधी कधी विचार केलाय का की, आपण असे का करत आहात? आपण असा विचार क्वचितच केला असेल. बिअर्डवर रिसर्च करणाऱ्या वैज्ञानिकांनुसार, एका रिसर्चमधून समोर आलंय की, दाढी ठेवणाऱ्या पुरूषांची विश्वसनीयता वाढते. बिअर्ड आणि पुरूषार्थ यांच्यात एक मनोवैज्ञानिक संबंध देखील आहे, जो मुळात पुरूषांच्या आक्रामकतेशी संबंधित आहे. 

अलिकडेच करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये दाढी ठेवण्याच्या एका सकारात्मक कारणाचा देखील शोध लावण्यात आला. यात असं जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला की, दाढी ठेवल्याने पुरूषांना आकर्षक असल्याची जाणीव होते का? हेच जाणून घेऊया. अलिकडेच करण्यात आलेल्या एका सर्व्हेनुसार, बिअर्ड लूकसोबत पुरूष जास्त कॉन्फिडेंट असतात. 

आत्मविश्वास वाढतो

या सर्व्हेनुसार, दाढी ठेवल्याने आपल्या आत्मविश्वासात सुधारणा होते. त्याशिवाय दाढी ताकद, पुरूषार्थ आणि इतर सकारात्मक गोष्टींचं देखील प्राचीन प्रतीक आहे. दाढीने आरशात बघितल्याने आत्मसन्मानही वाढू शकतो. त्याशिवाय आपली दाढी जेव्हा चांगली, आकर्षक किंवा चांगल्या शेपमध्ये असते, तेव्हा आपण गर्दीमध्येही उठून दिसता. दाढीवाला लूक असलेली व्यक्ती एखाद्या पार्टीमध्ये किंवा एखाद्या कार्यक्रमातही सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेऊ शकतो. जर इतिहासाची पाने उलगडून पाहिली तर दाढीचा संबंध शक्ती आणि धनासोबत जोडला जातो. पण 

सेल्फ केअर

दाढी वाढवणं काही सोपं काम नाही. आपला दाढीवाला लूक परफेक्ट आणि चांगला दिसावा यासाठी बरीच मेहनतही घ्यावी लागते. केस वाढण्यासाठी योग्य तो आहार घ्यावा लागतो. दाढी चांगली दिसण्यासाठी बरीच काळजीही घ्यावी लागते. दाढीची ठेवण चांगली असेल, तर दिसून येतं की, आपल्याला आपल्या हेल्थची आणि हायजीनची काळजी आहे. 

जर आपण दाढी वाढवण्याचा विचार केला असेल तर सुरूवातीच्या काही दिवसांमध्ये खाजेची समस्या होऊ शकते. घामामुळे ही समस्या होते. त्यामुळे दाढी स्वच्छ ठेवावी. दाढीला आठवड्यातून निदान शाम्पू करावं. असं केल्याने दाढी स्वच्छ होईल.

अधिक आकर्षण

एका रिसर्चनुसार, महिला दाढी ठेवणाऱ्या पुरूषांकडे अधिक आकर्षित होतात. डार्विनने सुद्धा हा सल्ला दिला होता की, पुरूषांचा दाढी असलेला लूक महिलांना अधिक भावतो. हे त्याप्रमाणेच मानलं जातं जसे की, काही जीव आपल्या जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी पंखांमध्ये काही रंग विकसित करतात किंवा काही ध्वनी विकसित करतात. संशोधकांचं मत आहे की, दाढी असणारे पुरूष शारीरिक आणि सामाजिक रूपाने जास्त प्रभावी वाटतात. 

असंही म्हटलं जातं की, दाढी असलेल्या तरूणांमध्ये खूप धैर्य असतं. ते कोणत्याही परिस्थितीला धैर्याने आणि शांतपणे सांभाळतात. जर त्यांना एखाद्या गोष्टीचा राग आला तर काही वेळातच ते शांत होतात. 

Web Title : दाढ़ी वाले पुरुष अधिक आकर्षक महसूस करते हैं: विज्ञान बताता है।

Web Summary : दाढ़ी आत्मविश्वास, ताकत और आकर्षण बढ़ाती है। शोध बताते हैं कि महिलाएं दाढ़ी वाले पुरुषों को अधिक प्रभावशाली मानती हैं। स्वस्थ और आकर्षक दाढ़ी बनाए रखने के लिए सेल्फ-केयर महत्वपूर्ण है।

Web Title : Bearded men feel more attractive: Science explains the beard look benefits.

Web Summary : Beards boost confidence, perceived strength, and attractiveness. Research suggests women find bearded men more appealing due to perceived dominance and social presence. Self-care is crucial for maintaining a healthy, attractive beard.