१. टोमॅटो :
पौष्टिकतेच्या बाबतीत टमाटे ‘सूपरफुड’ म्हणून ओळखले जातात. प्रोस्टेट कॅन्सरला आळा घालण्यासाठी फायदेशीर ‘लिकोपिन’ असते.
२. आॅयस्टर :
पुरुषांच्या लैंगिक आरोग्यासाठी लाभदायक झिंकचे प्रमाण आॅयस्टरमध्ये विपूल प्रमाणात असते. वीर्यनिर्मिती आणि हेल्दी टेस्टेस्टेरॉनची पातळी कायम राखण्याचे काम झिंक करते.
३. लसूण :
आपल्या हृदयाची काळजी घेण्यासाठी लसूण खूप फायदेशीर असते. अधिक प्रमाणात लसणाचे सेवन करणाºया पुरुषांमध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी असते.
४. सॅलमॉन :
केवळ प्रोटिनचा अत्युच्च स्रोत म्हणून नाही तर सॅलमॉनमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिडही विपूल प्रमाणात असते. प्रोस्टेट कॅन्सर, नैराश्य, कोलोरेक्टल कॅन्सरपासून बचाव होण्यासाठी मदत होते.
५. ब्लूबेरी :
ब्लूबेरीमध्ये प्रोअनथोस्यॅनिडीन्स असते. हार्ट अॅटॅक, मधूमेह, स्मृतिभ्रंश यांसारख्या आरोग्याव्याधींपासून आपले रक्षण करते.