भांडण सोडविणाऱ्याच्याच डोक्यात मारला लाकडाचा दांडा ; हाणामारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 05:58 PM2020-07-10T17:58:56+5:302020-07-10T18:01:12+5:30

भांडण सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींच्याच डोक्यात लागडी दांडा मारून हाणामारी केल्याचा प्रकार शिवाजीवाडी भारतनगर परिसरातील महानगरपालिकेच्या शाळेजवळ घडला. या घटनेत सहा जणांच्या टोळक्यांमध्ये बेदम हाणामारी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

A wooden stick struck him in the head; Fighting | भांडण सोडविणाऱ्याच्याच डोक्यात मारला लाकडाचा दांडा ; हाणामारी 

भांडण सोडविणाऱ्याच्याच डोक्यात मारला लाकडाचा दांडा ; हाणामारी 

googlenewsNext
ठळक मुद्देसहा जणांच्या टोळक्यात जबर हाणामारी भांडण सोडविणाऱ्यांनाही झोडपले

नाशिक : पैशांच्या कारणाहून झालेले भांडण सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींच्याच डोक्यात लागडी दांडा मारून हाणामारी केल्याचा प्रकार शिवाजीवाडी भारतनगर परिसरातील महानगरपालिकेच्या शाळेजवळ घडला. या घटनेत सहा जणांच्या टोळक्यांमध्ये  बुधवारी (दि.८) रात्री बेदम हाणामारी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. 
शिवाजीवाडी येथील महानगरपालिकेच्या शाळेजवळ घडलेल्या प्रकारात जनार्दन रामदास वारडे (३८) व किशोर श्रावण आंबेकर (३५) यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर आंबेकर यांच्या तक्रारीनुसार, संशयित जनार्धन रामदास वारडे व त्याचा भाचा विजय रामचंद्र वतार हे त्यांचा ठेकेदार गोपीनाथ शिंगाडे यांच्याशी पैशांवरून वाद घालत होते. हा वाद सोडवण्यासाठी आंबेकर गेले असता संशयितांनी त्यांना बेदम मारहाण केली. तर, जनार्धन रामदास वारडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार संशयित गोपीनाथ किसन शिंगाडे त्यांचे साथीदार किशोर आंबेकर, विशाल राजेंद्र मोरे या संशयितांनी बुधवारी दुपारी पैशांच्या कारणातून शिवीगाळ करत लाकडी दांड्यांनी वारडे यांना बेदम मारहाण केली. तसेच भांडण सोडविण्यासाठी आलेला वारडे यांचा मेहुणा त्र्यंबक शिलतर यांनाही तिघांनीही मारहाण केली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

Web Title: A wooden stick struck him in the head; Fighting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.