लक्ष्य सेन मलेशिया मास्टर्सच्या पात्रता फेरीत गारद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 04:30 AM2020-01-08T04:30:40+5:302020-01-08T04:30:43+5:30

मुख्य फेरीमध्ये स्थान मिळविण्यात अपयशी ठरला तर सात्विक साईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी ही पुरुष दुहेरीची जोडी मलेशिया मास्टर्सच्या पहिल्या फेरीत पराभूत झाली.

Guard in the qualifying round of the Target Sen Malaysia Masters | लक्ष्य सेन मलेशिया मास्टर्सच्या पात्रता फेरीत गारद

लक्ष्य सेन मलेशिया मास्टर्सच्या पात्रता फेरीत गारद

Next

क्वालालाम्पूर : भारताचा उदयोन्मुख बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन मंगळवारी येथे मुख्य फेरीमध्ये स्थान मिळविण्यात अपयशी ठरला तर सात्विक साईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी ही पुरुष दुहेरीची जोडी मलेशिया मास्टर्सच्या पहिल्या फेरीत पराभूत झाली.
लक्ष्यला डेन्मार्कच्या हेन्स क्रिस्टियन सोलबर्ग विटिंगसविरुद्ध ४९ मिनिट रंगलेल्या पुरुष एकेरीच्या संघर्षपूर्ण लढतीत २१-११, १८-२१, १४-२१ ने पराभव स्वीकारावा लागला. शुभंकर डे यालाही मुख्य फेरीत स्थान मिळवण्यात अपयश आले. सात्विक व चिराग ही जागतिक क्रमवारीतील १२ व्या क्रमांकाच्या पुरुष दुहेरी जोडीचा पहिल्या फेरीत ओंग यू सिन व तियो इ यी या मलेशियाच्या जागतिक क्रमवारीतील १९ व्या क्रमांकाच्या जोडीविरुद्ध १५-२१, २१-१८, १५-२१ अशा गुणांनी पराभव झाला.

Web Title: Guard in the qualifying round of the Target Sen Malaysia Masters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.