शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

टेस्लाचं 'सरप्राईज'! सर्वात लोकप्रिय इलेक्ट्रिक कारच्या किंमती केल्या कमी, येथे संपूर्ण लिस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 13:33 IST

Tesla Price Cut: टेस्लाने त्यांच्या लोकप्रिय कारच्या किंमतीत घट करून ग्राहकांना मोठ सरप्राईज दिले आहे.

अमेरिकेतील आघाडीची इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी टेस्लाने विक्रीतील घट आणि वाढत्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी मोठे पाऊल उचलले. कंपनीने त्यांच्या सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या मॉडेल व्हाय आणि मॉडेल ३ या दोन मॉडेल्स कमी किंमतीत अमेरिकेच्या बाजारपेठेत लॉन्च केले आहेत.

इलेक्ट्रिक कार उद्योगातील इतर कंपन्यांकडून तीव्र स्पर्धा आणि कंपनीचे सह-संस्थापक इलोन मस्क यांच्यावरील कथित बहिष्कारामुळे टेस्लाच्या विक्रीत लक्षणीय घट झाली. या कठीण काळात बाजारपेठेतील वाटा पुन्हा मिळवण्याच्या प्रयत्नात टेस्लाने हे दोन नवीन मॉडेल कमी किंमतीत लॉन्च करण्याचा निर्णय घेतला.

टेस्लाने लॉन्च केलेल्या नवीन आणि जुन्या मॉडेल्सच्या किमती

मॉडेल    व्हेरिएंटकिंमत (डॉलर)
मॉडेल वायस्टँडर्ड  ३९ हजार ९९० डॉलर
मॉडेल वायप्रीमियम रियर-व्हील ड्राइव्ह४४ हजार ९०० डॉलर
मॉडेल वायप्रीमियम ऑल-व्हील ड्राइव्ह४८ हजार ९९०
मॉडेल वायपरफॉर्मन्स ऑल-व्हील ड्राइव्ह५७ हजार ४९०
मॉडेल वायनवीन स्टँडर्ड३६ हजार ९९०
मॉडेल ३ प्रीमियम रियर-व्हील ड्राइव्ह४२ हजार ४९०
मॉडेल ३ प्रीमियम ऑल-व्हील ड्राइव्ह४७ हजार ४९०
मॉडेल ३ परफॉर्मन्स ऑल-व्हील ड्राइव्ह५४ हजार ९९०

न्यूयॉर्कमधील ग्राहकांना मोठा फायदा

न्यू यॉर्कर्ससाठी मॉडेल वाय स्टँडर्डची किंमत ३५ हजारांपेक्षा कमी असेल, ज्यामुळे ही कार त्यांच्यासाठी आणखी परवडणारी ठरेल. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टेस्लाने हे पाऊल उचलले आहे. ही नवीन परवडणारी मॉडेल्स मंदावलेली विक्री पुन्हा सुरू करण्यास मदत करतील, अशी टेस्लाला आशा आहे. मात्र, नवीन मॉडेल्स लॉन्च होऊनही कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण सुरूच आहे.
 

English
हिंदी सारांश
Web Title : Tesla Slashes Prices on Popular Electric Cars: Full List Here

Web Summary : Tesla has reduced prices on Model Y and Model 3 in the US amid sales decline and rising competition. New York buyers of Model Y Standard will get it for under $35,000. The move aims to boost sales, though company shares continue to fall.
टॅग्स :carकारAutomobileवाहनTeslaटेस्ला