कार मालकांनो लक्ष द्या! १ एप्रिलपासून पेट्रोलपंपांवर मिळणार फक्त RON 95 पेट्रोल; सरकारने घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 07:54 IST2026-02-27T07:52:53+5:302026-02-27T07:54:51+5:30

Petrol RON 95 news: पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणामुळे भारताने २०१४ पासून १.४० लाख कोटींचे परकीय चलन वाचवले आहे.

Petrol RON 95 news: Car owners, pay attention! Only RON 95 petrol will be available at petrol pumps from April; What will be the impact on your engine? Find out in detail | कार मालकांनो लक्ष द्या! १ एप्रिलपासून पेट्रोलपंपांवर मिळणार फक्त RON 95 पेट्रोल; सरकारने घेतला निर्णय

कार मालकांनो लक्ष द्या! १ एप्रिलपासून पेट्रोलपंपांवर मिळणार फक्त RON 95 पेट्रोल; सरकारने घेतला निर्णय

भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्रात एप्रिल २०२६ पासून एक मोठा बदल होणार आहे. केंद्र सरकारच्या पर्यावरणपूरक धोरणानुसार, देशभरातील पेट्रोल पंपांवर आता E20 इंधन RON ९५ (२०% इथेनॉल मिश्रित पेट्रोल) अनिवार्य केले जाणार आहे. वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि कच्च्या तेलाची आयात कमी करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. 

तुमच्या कारवर काय परिणाम होणार?
इंजिनची कार्यक्षमता: E20 पेट्रोल वापरण्यासाठी कारचे इंजिन त्या दर्जाचे असणे आवश्यक आहे. जुन्या गाड्यांचे इंजिन (जे केवळ पेट्रोलसाठी बनलेले आहेत) या इंधनामुळे खराब होण्याची शक्यता असते, कारण इथेनॉलमुळे रबर आणि प्लॅस्टिकचे सुटे भाग लवकर खराब होऊ शकतात.
मायलेजमध्ये घट: तज्ज्ञांच्या मते, सामान्य पेट्रोलच्या तुलनेत E20 इंधनामुळे गाडीच्या मायलेजमध्ये ६ ते ७ टक्क्यांची घट होऊ शकते.
गाड्यांच्या किमती: नवीन BS6 फेज-२ आणि आताच्या E20 सुसंगत इंजिन बनवण्यासाठी कंपन्यांना अधिक खर्च करावा लागत आहे. परिणामी, नवीन कारच्या किमतीत वाढ होऊ शकते.

सरकारचा उद्देश काय?
इथेनॉल हे प्रामुख्याने ऊस आणि धान्यापासून तयार केले जाते. यामुळे भारताचे परकीय चलन वाचण्यास मदत होईल आणि शेतकऱ्यांनाही याचा आर्थिक फायदा मिळेल. सध्याच्या अनेक नवीन गाड्या 'E20 Ready' इंजिनसह येत आहेत, त्यामुळे नवीन खरेदी करणाऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही.

प्रदूषण मुक्तीसाठी 'इथेनॉल' प्रभावी
नीती आयोगाच्या अभ्यास अहवालानुसार, सामान्य पेट्रोलच्या तुलनेत ऊसापासून बनवलेल्या इथेनॉलमुळे हरितगृह वायूंच्या उत्सर्जनात ६५ टक्क्यांची घट होते, तर मक्यापासून बनवलेल्या इथेनॉलमुळे ५० टक्के प्रदूषण कमी होते. यामुळे हवामान बदलाच्या संकटाचा सामना करण्यास मदत होत आहे.

काय आहे 'RON' आणि त्याचे महत्त्व?
इंधनाच्या गुणवत्तेत RON (Research Octane Number) अत्यंत महत्त्वाचा असतो. इथेनॉलमुळे पेट्रोलचा RON वाढतो. उच्च RON चा अर्थ असा की, इंधन प्रज्वलित होण्यापूर्वी अधिक संकुचन (Compression) सहन करू शकते. यामुळे इंजिनची स्थिरता वाढते आणि त्याची कामगिरी अधिक दर्जेदार होते.

Web Title : कार मालिकों ध्यान दें! 1 अप्रैल से केवल RON 95 पेट्रोल: सरकार का फैसला

Web Summary : अप्रैल से पेट्रोल पंपों पर E20 (20% इथेनॉल मिश्रित) RON 95 पेट्रोल मिलेगा। पुरानी कारों को इंजन की समस्या हो सकती है। माइलेज 6-7% तक घट सकता है। प्रदूषण कम करने और किसानों की आय बढ़ाने का लक्ष्य।

Web Title : Attention Car Owners! RON 95 Petrol Only From April, Says Government

Web Summary : From April, petrol pumps will dispense E20 (20% ethanol blend) RON 95 petrol. Older cars may face engine issues. Mileage could decrease by 6-7%. This move aims to curb pollution, reduce crude oil imports, and boost farmers' income.