शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 17:10 IST

नवरात्रीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत मारुती सुझुकीने तब्बल ८०००० हून अधिक कारची विक्री केली आहे....

देशभरातील बाजारांत सणासुदीची लगबग सुरू असतानाच, २२ सप्टेंबरपासून लागू झालेल्या नव्या जीएसटीनंतर लोकांमध्ये वाहन खरेदी संदर्भातही मोठा उत्साह बघायला मिळत आहे. कारच्या किमतीत झालेल्या लक्षणीय कपातीचा सर्वाधिक फायदा मारुती सुझुकीला होताना दिसत आहे. कंपनीने विक्रीचे जुने विक्रमही मोडीत काढले आहेत. महत्वाचे म्हणजे, जीएसटी कपातीमुळे वाहनांच्या किंमती तर कमी झाल्या आहेतच. शिवाय कंपनीनेही आकर्षक ऑफरची भर घातली आहे. यामुळे शोरूम्सवर ग्राहकांची प्रचंड गर्दी प्रचंड गर्दी दिसत आहे.

केवळ ५ दिवसांत तब्बल ८०००० वाहनांची वि्क्री -  नवरात्रीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत मारुती सुझुकीने तब्बल ८०००० हून अधिक कारची विक्री केली आहे. याशिवाय, रोज जवळपास ८०००० ग्राहक नवीन कारबद्दल चौकशी करत आहेत. शोरूम्समध्ये एवढी गर्दी होत आहेत की, रात्री ११ ते १२ वाजेपर्यंत गाड्यांची डिलिव्हरी करावी लागत आहे. विशेष म्हणजे, नवीन जीएसटी लागू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी मारुती सुझुकीने आपल्या ३५ वर्षांचा रेकॉर्ड मोडत एका दिवसात २५,००० कारची डिलिव्हरी केली होती.

मारुती सुझुकीचे विक्री आणि विपणन विभागाचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी पार्थो बॅनर्जी यांनी 'बिझनेस टुडे'ला दिलेल्या माहितीनुसार, "नवरात्रीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत कंपनीने ८०,००० वाहनांची विक्री केली आहे, तर रोज जवळपास ८०००० पर्यंत लोक चौकशी करत आहेत. आमच्या शोरूम्समध्ये प्रचंड गर्दी आहे. ग्राहकांना वाहने देण्यासाठी आमचे भागीदार रात्री उशिरापर्यंत काम करत आहेत."

₹१९९९ चा EMI -महत्वाचे म्हणजे, मारुती सुझुकीला कार विक्रीमध्ये मिळालेल्या या अभूतपूर्व यशामागे आकर्षक EMI योजनेची मोठी भूमिका आहे. सर्वसामान्यांना कार सहजपणे घेता याव्यात यासाठी कंपनीने एक प्रभावी EMI योजना सुरू केली आहे. या अंतर्गत ग्राहक केवळ ₹१,९९९ प्रति महिना (EMI) भरून कार खरेदी करू शकतात. यासंदर्भात बोलताना, "यामुळे दुचाकी वाहनांच्या मालकांसाठी आता चार चाकी वाहने खरेदी करणे सोपे झाले आहे," असे बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Maruti Suzuki Sells 80,000 Cars in 5 Days Amidst Festive Demand

Web Summary : Maruti Suzuki sees booming sales post-GST, fueled by festive season demand and attractive EMI plans. The company sold 80,000 cars in five days, with showrooms extending hours to meet customer demand. Affordable EMI options, like ₹1999 per month, are driving the surge, attracting two-wheeler owners to upgrade.
टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीMarutiमारुतीAutomobileवाहन