शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

ना आवाज, ना धूर; इलेक्ट्रिक स्कूटरची धूम! ईव्ही स्कूटरला का मिळतेय ग्राहकांची पसंती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 12:55 IST

इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे रोजच्या प्रवासाच्या खर्चात होणारी भरघोस बचत. इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये इंजिन नसल्यामुळे मुव्हिंग पार्ट खूप कमी असतात. यामुळे देखभाल खर्च अत्यंत कमी राहतो. 

गेल्या काही वर्षांत भारतीय रस्त्यांवर शांत आणि धूरमुक्त अशा इलेक्ट्रिक वाहनांचा (EV) वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रोजच्या प्रवासासाठी 'ई-स्कूटर' हा केवळ फॅशनचा भाग नसून ती काळाची गरज बनली आहे. इंधनावरचा खर्च वाचवणारी, दिसायला हटके आणि पर्यावरणपूरक ईव्हीला ग्राहक पसंती देत आहेत. सगळी हायटेक फीचर्स देणाऱ्या नवनव्या स्कूटर्सनी ईव्ही मार्केटचं समीकरण बदलून टाकलं आहे. ईव्ही स्कूटर घेणं का, कसं फायद्याचं ठरतं, यावर एक नजर टाकूया. 

आर्थिक गणित: जबरदस्त बचत आणि कमी देखभाल खर्च
इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे रोजच्या प्रवासाच्या खर्चात होणारी भरघोस बचत. एका उदाहरणावरून सांगायचे तर, ज्याचे रोजचे रनिंग साधारण ३५ किमी आहे, अशा व्यक्ती ई-स्कूटर वापरून १८,००० किमीच्या प्रवासात जवळपास ४०००० रुपयांची बचत करतात. म्हणजेच, अवघ्या सव्वा वर्षात गाडीच्या किमतीचा लक्षणीय म्हणजेच ३३ टक्के हिस्सा वसूल होऊ शकतो.

इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये इंजिन नसल्यामुळे मुव्हिंग पार्ट खूप कमी असतात. यामुळे देखभाल खर्च अत्यंत कमी राहतो. ई-स्कूटरची पहिली सर्व्हिसिंग ५,००० किमीवर असते आणि तिचा खर्चही केवळ १५०० रुपयांच्या आसपास असतो. त्यामुळे पैशांची आणि वेळेची मोठी बचत होते.

स्मार्ट फीचर्स आणि आधुनिक तंत्रज्ञान
आजच्या ई-स्कूटर्स केवळ बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या नाहीत, तर त्या 'स्मार्ट गॅजेट्स' आहेत.

रिव्हर्स गिअर: पार्किंगमध्ये किंवा उतारावर गाडी मागे घेताना येणारा ताण कमी होतो.

राईडिंग मोड्स: तुमच्या गरजेनुसार इको (जास्त रेंज), राईड आणि स्पोर्ट्स (जास्त स्पीड) मोड निवडता येतात.

रिजनरेटिव्ह ब्रेकिंग: तुम्ही जेव्हा जेव्हा ब्रेक लावता, तेव्हा निर्माण होणारी ऊर्जा पुन्हा बॅटरीमध्ये साठवली जाते, ज्यामुळे गाडीची रेंज वाढण्यास मदत होते.

कनेक्टिव्हिटी: ब्ल्यूटूथ आणि मोबाईल ॲपद्वारे तुम्ही गाडीचे लाईव्ह लोकेशन, बॅटरीची स्थिती, राईडिंग स्टॅटिस्टिक्स आणि नेव्हिगेशन सहज पाहू शकता.

पर्यावरण पूरकता आणि सरकारी लाभ
ई-स्कूटरमधून शून्य कार्बन उत्सर्जन होते, ज्यामुळे शहरांमधील हवा शुद्ध राहण्यास मदत होते. तसेच, केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून मिळणाऱ्या सबसिडीमुळे या गाड्यांची ऑन-रोड किंमत कमी होते. याशिवाय, अनेक राज्यांमध्ये रस्ते कर आणि नोंदणी शुल्कामध्ये मिळणारी पूर्ण सवलत ग्राहकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते.

चार्जिंगची चिंता सोडा!

हे सगळे फायदे पाहून अनेकांचा कल ईव्ही स्कूटर घेण्याकडे दिसतो. मात्र, चार्जिंग हा काही वेळा अडचणीचा विषय ठरतो. काही सोसायट्या पार्किंगमध्ये चार्जिंगला परवानगी देत नाहीत. त्यामुळे बॅटरी चार्ज कशी करायची हा प्रश्न येतो. हा विषयच 'हिरो'ने निकाली काढला आहे. Hero Vida vx2 या आपल्या नव्याकोऱ्या EVOOTER मध्ये कंपनीने रुमूव्हेबल बॅटरी दिली आहे. म्हणजेच, तुम्ही तुमच्या स्कूटरची बॅटरी सहज काढून तुमच्या घरात किंवा ऑफिसमध्ये नेऊन मोबाईलप्रमाणे चार्ज करू शकता. यामुळे ज्यांच्याकडे पार्किंगमध्ये चार्जिंगची सोय नाही, त्यांच्यासाठी विडा वरदानच ठरते. बाकी सगळ्या हायटेक फीचर्ससोबत रिमूव्हेबल बॅटरी ही Hero Vida vx2 ची जमेची बाजू आहे. 

जास्तीची बूट स्पेस...

या स्कूटरमध्ये मोठी 'बूट स्पेस' (डिकी) देखील मिळते, ज्यात दोन हाफ-फेस हेल्मेट सहज ठेवता येतात. हिरो विडा व्हीएक्स 2 ची रेंज ही आयडीसीनुसार १४२ किमी आहे, जी रोजच्या शहरांतर्गत प्रवासासाठी पुरेशी आहे. याशिवाय, विडाच्या मोबाईल ॲपनुसार जवळच्या फास्ट चार्जरवर जाऊन काही मिनिटांत चार्ज करून तुम्ही पुढच्या प्रवासाला निघू शकता.

थोडक्यात सांगायचे तर, स्टाईल, जबरदस्त बचत आणि स्मार्ट तंत्रज्ञानाचा अनुभव घ्यायचा असेल, ईव्ही स्कूटर आणि त्यातही Hero Vida VX2 हा एक उत्कृष्ट पर्याय आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Electric Scooters Surge: Why Consumers Prefer EVs, Benefits Explored

Web Summary : Electric scooters gain popularity due to cost savings, low maintenance, and advanced features like regenerative braking. Government subsidies and environmental benefits further drive adoption. Hero Vida VX2's removable battery addresses charging concerns, offering convenience and ample boot space for riders.
टॅग्स :hero moto corporationहिरो मोटो कॉर्पelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर