५.६५ लाखांत ७-सीटर कारचा धमाका; देशभरात सुरू झाली डिलिव्हरी; १९.६ किमी मायलेज! ढासू आहेत फीचर्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 12:29 IST2026-03-05T12:29:13+5:302026-03-05T12:29:13+5:30
चार मीटरपेक्षा कमी लांबीची ही कॉम्पॅक्ट एमपीव्ही रेनॉल्ट ट्राइबरवर आधारित असली, तरी खास कौटुंबिक वापरासाठी तयार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या कारमध्ये कमी किमतीत जबरदस्त आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत.

५.६५ लाखांत ७-सीटर कारचा धमाका; देशभरात सुरू झाली डिलिव्हरी; १९.६ किमी मायलेज! ढासू आहेत फीचर्स
भारतीय वाहन बाजारात कमी बजेटमध्ये मोठ्या कुटुंबासाठी कार शोधणाऱ्या ग्राहकांसाठी निसानने एक नवी ७ सीटर कार बाजारात आणली आहे. या कारचं नाव आहे 'Gravite'. आता देशभर या कारची डिलिव्हरीही सुरू झाली आहे. ५.६५ लाख रुपये (एक्स-शोरूम) इतक्या किफायतशीर सुरुवातीच्या किमतीत ही कार उपलब्ध करून देण्यात आली आहे. चार मीटरपेक्षा कमी लांबीची ही कॉम्पॅक्ट एमपीव्ही रेनॉल्ट ट्राइबरवर आधारित असली, तरी खास कौटुंबिक वापरासाठी तयार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या कारमध्ये कमी किमतीत जबरदस्त आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत.
आकर्षक डिझाइन -
निसान Gravite चे डिझाइन अत्यंत अट्रॅक्टिव्ह आणि कणखर आहे. कारच्या दर्शनी भागात निसानची सिग्नेचर 'व्ही-मोशन' ग्रिल, स्लिम हेडलाईट्स आणि डे-टाइम रनिंग लाईट्स देण्यात आल्या आहेत, ज्यामुळे कारला आधुनिक लूक मिळतो. बोनटवर 'Gravite' असे नाव ठळकपणे लिहिलेले असून, बंपरमधील सिल्वर फिनिश आणि स्किड प्लेट तिला स्पोर्टी लूक देतात. यामध्ये १५-इंच अलॉय व्हील्स, रूफ रेल्स आणि मागील बाजूस क्रोम पट्टीने जोडलेल्या शार्प टेललाईट्स देण्यात आल्या आहेत. ही कार फॉरेस्ट ग्रीन, ओनिक्स ब्लॅक, ब्लेड सिल्वर, मेटॅलिक ग्रे आणि स्टॉर्म व्हाईट अशा पाच रंगांत उपलब्ध आहे.
प्रीमियम केबिन अन् ढासू फीचर्स -
कारचे केबिन काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या थीममध्ये असून ते अतिशय प्रीमियम वाटते. सात प्रवाशांच्या आसनक्षमतेसह यात दर्जेदार मटेरियलचा वापर करण्यात आला आहे. सुरक्षेसाठी आणि सुविधेसाठी ७-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ८-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम आणि उत्तम मोबाईल कनेक्टिव्हिटी यांसारखे फीचर्स यात मिळतात.
इंजिन क्षमता आणि मायलेज:
या कारमध्ये १.० लीटर, ३-सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे, जे ७१ हॉर्सपावर आणि ९६ एनएम टॉर्क जनरेट करते. ५-स्पीड मॅन्युअल (१९.३ किमी/लीटर) आणि एएमटी (१९.६ किमी/लीटर) अशा दोन्ही पर्यायांत ही कार उपलब्ध आहे. भविष्यात कंपनी याचे सीएनजी व्हर्जनही लाँच करणार आहे.