शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
3
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
4
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
5
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
6
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
7
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
8
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
9
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
10
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
11
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
12
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
13
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
14
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
15
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
16
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
17
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
18
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
19
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
20
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

भररस्त्यात १०० हून अधिक 'रोबोटॅक्सी' अचानक थांबल्या; आतमध्ये बसलेल्यांची भीतीने गाळण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 17:18 IST

Robotaxi Shocking news : चीनच्या वुहान शहरात १०० पेक्षा जास्त बायडू अपोलो गो (Baidu Apollo Go) रोबोटॅक्सी अचानक बंद पडल्या. या तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली.

भविष्यातील वाहतूक मानल्या जाणाऱ्या 'सेल्फ-ड्राइव्हिंग' तंत्रज्ञानाला चीनमध्ये मोठा धक्का बसला आहे. चीनमधील वुहान शहरात बुधवारी एका मोठ्या तांत्रिक बिघाडामुळे 'बायडू' कंपनीच्या १०० हून अधिक 'अपोलो गो' रोबोटॅक्सी भररस्त्यात अचानक थांबल्या. या प्रकारामुळे शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी झाली असून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री ९ च्या सुमारास अचानक १०० हून अधिक विनाचालक टॅक्सी रस्त्यांच्या मधोमध थांबल्या. अनेक गाड्या रिंग रोड आणि हायवेच्या मधल्या लेनमध्ये बंद पडल्याने प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता. बाजूने वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे अनेक प्रवासी घाबरून गाडीतून खाली उतरले नाहीत.

एका प्रवाशाने सांगितले की, वळण घेत असताना अचानक टॅक्सी थांबली आणि स्क्रीनवर "ड्रायव्हिंग सिस्टममध्ये बिघाड झाला असून स्टाफ ५ मिनिटांत पोहोचेल" असा संदेश आला. मात्र, बराच वेळ कोणीही मदतीला आले नाही. अखेर काहींनी 'SOS' बटण दाबून मदतीची मागणी केली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
चीनमधील दिग्गज टेक कंपनी 'बायडू' या टॅक्सी चालवते. जगभरात या तंत्रज्ञानाचा विस्तार केला जात असताना वुहानमधील या 'सिस्टम फेलियर'मुळे सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. यापूर्वी अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोमध्येही 'वेमो' (Waymo) कंपनीच्या गाड्यांबाबत असाच प्रकार घडला होता. या घटनेमुळे आता चालकविरहित गाड्या किती सुरक्षित आहेत, याबाबत तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : China: Robotaxis Halt Mid-Road, Passengers Panic Due to System Failure

Web Summary : Over 100 Baidu robotaxis in Wuhan, China, malfunctioned, causing traffic chaos and passenger fear. A system failure left driverless cars stranded, triggering safety concerns about self-driving technology after similar incidents in the US. Passengers were trapped inside vehicles awaiting rescue.
टॅग्स :chinaचीन