Electric Supercar: येड लावणार! भारताची पहिली इलेक्ट्रीक सुपरकार Azani येतेय; 700 किमीची जबरदस्त रेंज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2021 03:32 PM2021-08-05T15:32:29+5:302021-08-05T15:36:35+5:30

Mean Metal Azani Indian Hypercar: अझानीबाबत बोलायचे झाले तर ही कार McLaren सुपरकार्सच्या डिझाईनवरून डेव्हलप केलेली वाटते. तुम्हाला असे वाटले की ही खरोखरच परदेशातील सुपरकार आहे. भारतातील ऑटोमोबाईल कंपन्या वेगाने इलेक्ट्रीक वाहनांवर वळत आहेत.

India's very own electric supercar Azani ready to launch; 523 to 700 km Range | Electric Supercar: येड लावणार! भारताची पहिली इलेक्ट्रीक सुपरकार Azani येतेय; 700 किमीची जबरदस्त रेंज

Electric Supercar: येड लावणार! भारताची पहिली इलेक्ट्रीक सुपरकार Azani येतेय; 700 किमीची जबरदस्त रेंज

Next

Mean Metal Motors लवकरच भारतात आपली इलेक्ट्रीक सुपरकार Azani लाँच करणार आहे. सध्या भारतात जेवढ्या इलेक्ट्रीक कार आहेत, त्यांच्यापेक्षा खूप जास्त या कारची रेंज आहे. याचबरोबर ही कार पावरफूल आणि स्टायलिशही असणार आहे. कारचे डिझाईन एरोडायनॅमिक असल्याने ही कार काही सेकंदांतच वादळासारखा वेग पकडेल. महत्वाचे म्हणजे भारतीय इलेक्ट्रीक कार असल्याने तिला सोशल मीडियावरही जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. (Mean Metal Motors' (MMM) Azani is capable of running up to 700 km on a single charge.)

Nitin Gadkari: नितीन गडकरींना कंपन्यांपेक्षा कार मालकांची चिंता; म्हणाले, 'सहा एअरबॅग द्या', पण...

Mean Metal Motors ची ही Azani कार टेस्लाला भारी पडण्याची शक्यता आहे. कारण याचे डिझाईन टेस्लापेक्षा जास्त आकर्षक आहे. अझानीबाबत बोलायचे झाले तर ही कार McLaren सुपरकार्सच्या डिझाईनवरून डेव्हलप केलेली वाटते. तुम्हाला असे वाटले की ही खरोखरच परदेशातील सुपरकार आहे. भारतातील ऑटोमोबाईल कंपन्या वेगाने इलेक्ट्रीक वाहनांवर वळत आहेत.

Indian Army: खतरनाक! सर्वाधिक उंचीवरचा रस्ता भारतात; BRO चा पराक्रम पाहून जग 'कोमात'

अझानीमध्ये पुढे एलईडी हेडलँप आणि डीआरएल देण्यात आले आहेत. तसेच मोठे एअर व्हेंट्स देण्यात आले आहेत, जे कारला थंड ठेवतात. एअरोडायनॅमिक असल्याने वारा वेगाने पास होईल आणि कारदेखील स्टेबल राहिल. (Mean Metal Motors Azani Is An Indian Electric Hypercar With 1,000 HP)
सिंगल चार्जमध्ये ही कार 325 मैल धावू शकते. याचा अर्थ ही कार 523 ते 700 किलोमीटरचे अंतर कापेल. 2.1 सेकंदातच ही कार 0 ते 60 मैलाचा (97 kph) वेग पकडते. तर सर्वाधिक वेग हा 220 मैल प्रति तास (322 km) आहे. याकारचे इंजिन 1000 hp ची ताकद प्रदान करते. 120 किलोवॉटची बॅटरी देण्यात आली आहे.

Ola electric scooter ची प्रतिक्षा अखेर संपली; कंपनीकडून लाँचिंग तारीख जाहीर

या कारमध्ये ऑगमेंटेड रियलिटी डिस्प्ले, एम लॉग इंटरगेशन, अॅडव्हान्स मॉर्फिंग सीट्स, अॅडव्हान्स टेलीमेटिक्स, अडॅप्टिव क्रूज कंट्रोल, इमरजन्सी ब्रेकिंग, ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन, लेन चेंज, कोलिजन अवॉइडेंस सिस्टीम, टॉर्क विक्टोरिंग सारख्या अद्ययावत फीचर्स देण्यात आली आहेत. 

Kia Motors ने लाँच केली पहिली इलेक्ट्रीक सेदान; एका चार्जिंगमध्ये 475 km रेंज, थंडीत 600 किमीही जाते

Web Title: India's very own electric supercar Azani ready to launch; 523 to 700 km Range

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.