Ola electric scooter ची प्रतिक्षा अखेर संपली; कंपनीकडून लाँचिंग तारीख जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 04:37 PM2021-08-03T16:37:14+5:302021-08-03T16:37:34+5:30

The wait for the Ola electric scooter is finally over: ओला ईलेक्ट्रीकने 15 जुलै रोजी 499 रुपयांत स्कूटर बुक करण्याची घोषणा केली होती. याद्वारे कंपनी बुकिंग केलेल्या ग्राहकांना टप्प्याटप्प्याने स्कूटरची अपडेट देत राहणार आहे. अद्याप कंपनीने स्कूटरची किंमत जाहीर केलेली नाहीय.

Ola electric Scooter Launch date: Ola electric Scooter will Launch on 15 august; Bhavish Aggarwal declared | Ola electric scooter ची प्रतिक्षा अखेर संपली; कंपनीकडून लाँचिंग तारीख जाहीर

Ola electric scooter ची प्रतिक्षा अखेर संपली; कंपनीकडून लाँचिंग तारीख जाहीर

googlenewsNext

Ola Electric scooter launch Date: ओला इलेक्ट्रीकचे (Ola electric ) सीईओ भाविश अग्रवाल यांनी ओलाची पहिली इलेक्ट्रीक स्कूटर (Ola e-scooter launch date) केव्हा लाँच होणार याची तारीख जाहीर केली आहे. 15 जुलैला सुरु केलेल्या बुकिंगला जबरदस्त प्रतिसाद मिळाला असून फक्त 499 रुपयांत स्कूटर बुक करायची आहे. ऑनलाईन बुकिंगद्वारे डिलिव्हरीपर्यंत सारेकाही ऑनलाईनच केले जाणार आहे. (launch event for the Ola Scooter on 15th August)

Ola Scooter ची थेट घरी देणार डिलिव्हरी; 10 रंगात, कर्ज प्रक्रिया, सर्व्हिस कशी मिळणार, जाणून घ्या...

ओला ईलेक्ट्रीकने 15 जुलै रोजी 499 रुपयांत स्कूटर बुक करण्याची घोषणा केली होती. याद्वारे कंपनी बुकिंग केलेल्या ग्राहकांना टप्प्याटप्प्याने स्कूटरची अपडेट देत राहणार आहे. अद्याप कंपनीने स्कूटची किंमत जाहीर केलेली नाहीय. जवळपास 1 लाखांहून अधिक लोकांनी याचे आगाऊ बुकिंग केले आहे, असे अग्रवाल यांनी ट्विट केले आहे. ज्या ग्राहकांना ही स्कूटर आव़डणार नाही ते त्यांचे बुकिंग रद्द करू शकतात. त्यांचे पैसे मागे दिले जाणार आहेत. पहिल्यांदा बुकींग करणाऱ्या ग्राहकांना डिलिवरीसाठी प्राधान्य दिलं जाईल असं OLA नं म्हटलं आहे.

Ola Scooter 15 ऑगस्टला लाँच केली जाणार आहे. तसेच या स्कूटरचा कोणताही डीलर नेमण्यात येणार नाहीय. म्हणजेच तुमच्या आजुबाजुला या स्कूटरचे शोरुम नसणार आहे. यामुळे ही स्कूटर थेट घरी डिलिव्हर केली जाणार आहे. ola Electric आपल्या Series-S स्कूटरच्या डिलिव्हरीसाठी ‘डायरेक्ट-2-कंज्यूमर’ (D2C) मॉडेल अवलंबणार आहे. थेट ग्राहकाच्या घरी नेऊन ही स्कूटर दिली जाणार आहे. Ola Electric व्हेईकल मॅन्युफॅक्चरर कंपनी नाही तर टेक मोबिलिटी स्टार्टअप म्हणून संबोधत आहे. ओला स्कूटर केवळ घरी डिलिव्हर केली जाणार नाही, तर पुढच्या सर्व्हिसेस देखील दारातच येऊन दिल्या जाणार आहेत. यामुळे डीलरशीपचे पैसे वाचणार आहेत. (When Ola Electric scooter launch? )

Ola Electric Scooter बुक केलीय? जरा हे पाच पर्याय बघून घ्या; 240 किमीची रेंज, 70 मिनिटांत फुल चार्ज

Ola Scooter च्या डोअरस्टेप डिलिव्हरीसाठी Ola Electric वेगळे लॉजिस्टिक डिपार्टमेंट बनविणार आहे. हा विभाग ग्राहकांसाठी थेट खरेदी, डॉक्युमेंटेशन आणि कर्जासह अन्य सुविधा पुरविणार आहे.

स्कूटर बुक केलेल्यांचे धन्य़वाद! ओलाची ईलेक्ट्रीक स्कूटर येत्या 15 ऑगस्टला लाँच करण्यात येणार आहे. स्कूटरचे पूर्ण स्पेसिफिकेशन आणि डिटेल्स व उपलब्धता तुम्हाला कळविली जाईल, असे भावीश अग्रवाल यांनी म्हटले आहे. 
 

Web Title: Ola electric Scooter Launch date: Ola electric Scooter will Launch on 15 august; Bhavish Aggarwal declared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.