शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

२०३० पर्यंत भारतीय रस्त्यांवर ५ कोटी जुनी वाहने असणार; नीती आयोगाचा देशाला गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 17:58 IST

India old vehicle crisis 2030 : सावधान! २०३० पर्यंत भारताच्या रस्त्यांवर ५ कोटी जुन्या गाड्यांचा ढिगारा असेल. नीती आयोगाने प्रदूषणाबाबत दिला मोठा इशारा.

नवी दिल्ली: भारताच्या रस्त्यांवर येत्या काही वर्षांत जुन्या आणि अनफिट वाहनांचे एक मोठे संकट उभे राहणार आहे. नीती आयोगाच्या ताज्या अहवालानुसार, जर वेळीच कठोर पावले उचलली नाहीत, तर २०३० पर्यंत देशात सुमारे ५ कोटी आयुष्य संपलेल्या गाड्या असतील. म्हणजेच या गाड्या केवळ चालवण्यासाठी असुरक्षित नसून पर्यावरणासाठीही घातक ठरणार आहेत.

नीती आयोगाने आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे की, बीएस-६ (BS-VI) नियमांपूर्वी तयार झालेल्या जुन्या गाड्या नवीन गाड्यांच्या तुलनेत ८ पट जास्त प्रदूषण पसरवतात. सध्या देशात दरवर्षी २ कोटी नवीन वाहने रस्त्यावर येत आहेत. २०२० मध्ये १ कोटी असलेली जुन्या वाहनांची संख्या २०२५ पर्यंत २.३ कोटींवर गेली आहे. २०३० पर्यंत हा आकडा ५ कोटींच्या पार जाईल, ज्यामुळे रस्ते कोंडी आणि हवेच्या प्रदूषणात मोठी वाढ होईल.

स्क्रॅपिंग सेंटरमधील आव्हाने...
सरकारने आधुनिक 'स्क्रॅपिंग सेंटर' सुरू केले असले तरी, अनेक वाहन मालक अजूनही स्थानिक भंगारवाल्यांकडे जाणे पसंत करतात. याची काही प्रमुख कारणे आहेत, स्थानिक भंगारवाले सरकारी केंद्रांपेक्षा १५ ते २० हजार रुपये जास्त देतात. स्थानिक कबाडी कोणतेही अधिकृत प्रमाणपत्र देत नाहीत, ज्यामुळे वाहन मालकांना नवीन गाडी खरेदी करताना मिळणाऱ्या सरकारी सवलतींचा लाभ मिळत नाही. २०२७ पर्यंत देशाला किमान ५०० फिटनेस टेस्टिंग स्टेशन्सची गरज आहे, मात्र सध्या ही संख्या अत्यंत कमी आहे.

कचऱ्यातून सोने...
जुन्या गाड्या केवळ कचरा नसून त्या मौल्यवान धातूंचा स्रोत आहेत. जर २००५ ते २०२३ दरम्यानच्या गाड्यांचे योग्य रिसायकलिंग झाले, तर त्यातून ९.८ कोटी टन स्टील मिळू शकते. यामुळे पर्यावरणातील कार्बन उत्सर्जनामध्ये ४.३ कोटी टनांनी घट होऊ शकते, असा अंदाज अहवालात वर्तवण्यात आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : NITI Aayog Warns: 50 Million Old Vehicles on Indian Roads by 2030

Web Summary : India faces a crisis of aging vehicles. NITI Aayog warns that without action, 50 million unsafe, polluting cars will clog roads by 2030. Scrapping faces hurdles, with local vendors offering more money. Recycling could yield valuable steel and cut emissions.
टॅग्स :NIti Ayogनिती आयोगpollutionप्रदूषण