शहरं
Join us  
Trending Stories
1
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
2
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
3
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
4
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
5
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
6
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
7
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
8
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
9
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
10
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
11
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
12
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
13
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
14
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
15
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
16
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
17
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
18
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
19
नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात
20
महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून 
Daily Top 2Weekly Top 5

इलेक्ट्रिक वाहनांच्या दुनियेत धमाका! एकदा चार्ज करा अन् १२०० किमी चालवा; किंमत फक्त ३.४७ लाख; जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 10:07 IST

ही कार एकदा पूर्ण चार्ज केल्यावर तब्बल १२०० किमीपर्यंत धावू शकते. हा कार भारतात लाँच झाल्यास, टाटा टियागो EV आणि एमजी कॉमेट EV शी तिचा थेट सामना होईल.

भारतीय इलेक्ट्रिक वाहन (EV) बाजार सध्या वेगाने विस्तारताना दिसत आहे. येथे अनेक परदेशी कंपन्याही आपले नशीब आजमावत आहेत. व्हिएतनामच्या 'विनफास्ट'नंतर, आता चीनची दिग्गज ऑटोमोबाईल कंपनी 'बेस्ट्यून' (Bestune) आपल्या स्वस्त आणि दमदार रेंज असलेल्या कारसह भारतात एन्ट्री करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने चिनी बाजारपेठेत आपली 'शाओमा' (Xiaoma) ही मायक्रो इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. या कारने कमी किंमती आणि ढासू रेंजमुळे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. 

बेस्ट्यून शाओमाची किंमत आणि रेंज -
बेस्ट्यून शाओमाची किंमत ३०००० ते ५०००० युआन म्हणजे सुमारे ३.४७ लाख ते ५.७८ लाख रुपयांपर्यंत आहे. महत्वाचे म्हणजे, ही कार एकदा पूर्ण चार्ज केल्यावर तब्बल १२०० किमीपर्यंत धावू शकते. हा कार भारतात लाँच झाल्यास, टाटा टियागो EV आणि एमजी कॉमेट EV शी तिचा थेट सामना होईल.

काही खास फिचर्स आणि बॅटरी -
ही कार 'FME' प्लॅटफॉर्मवर बेस्ड आहे. या मध्ये A1 आणि A2 असे दोन सब-प्लॅटफॉर्म आहेत. A1 २७००–२८५० मिमी व्हीलबेस असलेल्या सबकॉम्पॅक्ट आणि कॉम्पॅक्ट वाहनांसाठी आहे. A2 चा वापर २७००–३००० मिमी व्हीलबेस असलेल्या गाड्यांसाठी केला जातो. EV ची रेंज ८०० किमी एवढी असून तीची एक्सटेंडरची रेंज १२०० किमी पेक्षाही अधिक आहे. दोन्ही प्लॅटफॉर्म ८०० V आर्किटेक्चरला सपोर्ट करतात. यात २० किलोवॅटची सिंगल इलेक्ट्रिक मोटर आणि लिथियम-आयरन फॉस्फेट (LFP) बॅटरी वापरण्यात आली आहे. 

सुरक्षिततेचा विचार करता, ड्रायव्हर साइड एअरबॅग देण्यात आली आहे. ३००० मिमी लांबी, १५१० मिमी रुंद आणि १६३० मिमी उंची असलेल्या या ३-डोर कारमध्ये ७ इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम आणि आकर्षक ड्युअल-टोन डॅशबोर्ड थीम देण्यात आली आहे. सध्या या कारचे हार्डटॉप व्हेरिएंट विक्रीसाठी उपलब्ध असून भविष्यात कन्व्हर्टिबल व्हेरिएंट येण्याचीही शक्यता आहे. अ‍ॅनिमेशन फिल्ममधील कारसारखी दिसणारी ही छोटी कार भारतीय ग्राहकांच्या बजेटमध्ये फिट बसू शकते.

English
हिंदी सारांश
Web Title : Bestune Xiaoma EV: 1200km Range, Affordable Price Shakes EV Market!

Web Summary : China's Bestune enters India with the Xiaoma EV, boasting a 1200km range and a starting price of ₹3.47 lakh. This compact EV features a 7-inch touchscreen, LFP battery, and promises to compete with Tata Tiago EV and MG Comet EV.
टॅग्स :AutomobileवाहनcarकारElectric Carइलेक्ट्रिक कारchinaचीनMarketबाजार