शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

युद्ध, पाडवा आणि सबसिडी संपण्याची धास्ती...! लोक इलेक्ट्रीक वाहनांवर तुटून पडले, आजपर्यंत नाही झालेला असा सेल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 11:03 IST

EV Sales March 2026 India : "तुम्ही या महिन्यात इलेक्ट्रिक गाडी खरेदी केली का?" भारतीय ईव्ही मार्केटमध्ये मार्च २०२६ मध्ये रेकॉर्ड ब्रेक विक्री झाली आहे. इलेक्ट्रिक कार विक्री ४९% तर टू-व्हीलर ३६% ने वाढल्या आहेत. CAFE-2 मानके आणि सबसिडी बदलाचा हा परिणाम.

भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात मार्च २०२६ हा महिना 'ईव्ही क्रांती'चा साक्षीदार ठरला आहे. केंद्र सरकारच्या 'PM E-DRIVE' योजनेची सबसिडी ३१ मार्च रोजी संपणार असल्याने, स्वस्त दरात इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी शोरूममध्ये एकच गर्दी केली होती. यामुळे मार्च महिन्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत.

ताज्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये भारतात २१ लाखांहून अधिक इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली आहे. एकट्या मार्च महिन्यात टू-व्हीलर सेगमेंटमध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली. टीव्हीएस, बजाज आणि एथर यांसारख्या कंपन्यांनी विक्रीत बाजी मारली आहे.

विक्रमी आकडेवारीवर एक नजर

मार्च २०२६ मध्ये नोंदणी झालेल्या वाहनांची संख्या थक्क करणारी आहे:

  • इलेक्ट्रिक कार: १९,७११ युनिट्स (४९% वाढ)

  • इलेक्ट्रिक टू-व्हीलर्स: १,७७,४८५ युनिट्स (३६% वाढ)

  • वार्षिक वाढ: संपूर्ण आर्थिक वर्ष २६ (FY26) मध्ये इलेक्ट्रिक कारची विक्री ८२ टक्क्यांनी वाढून २ लाख युनिट्सच्या जवळ पोहोचली आहे.

ग्राहकांच्या घाईचे मुख्य कारण
१ एप्रिल २०२६ पासून ईव्ही सबसिडीच्या नियमांत बदल होणार असल्याने गाड्यांच्या किमती वाढण्याची शक्यता होती. यामुळे कंपन्या ग्राहकांना तसेच सांगत होत्या. यामुळे ग्राहकांनी किंमत वाढण्याच्या भीतीतून खरेदी केली. अखेर महिन्याच्या शेवटी केंद्र सरकारने सबसिडीची मुदत वाढविली. ३१ मार्च ही सबसिडी मिळवण्याची शेवटची तारीख होती. १ एप्रिलपासून अनेक कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर्स आणि कारच्या किमती २% ते ५% पर्यंत वाढवण्याचे संकेत दिले आहेत.मार्च अखेर असल्याने कंपन्यांनी जुना स्टॉक संपवण्यासाठी १ लाख ते १० लाख रुपयांपर्यंतचे 'मेगा मार्च' डिस्काउंट दिले होते. एथरच्या रिझ्टावर कधी नव्हे तो ४००० रुपयांचा डिस्काऊंट मिळत होता.

पुढील वाटचाल: एप्रिलमध्ये काय बदलणार?
तज्ज्ञांच्या मते, मार्चमधील या विक्रमी खरेदीनंतर एप्रिल महिन्यात विक्रीत थोडी घट होऊ शकते. मात्र, सरकारने आता गुणवत्तेवर आधारित प्रोत्साहन देण्यावर भर दिला असल्याने, भविष्यात अधिक दर्जेदार आणि जास्त रेंज देणाऱ्या इलेक्ट्रिक गाड्या बाजारात येतील.

English
हिंदी सारांश
Web Title : Electric Vehicle Sales Surge in March Amid Subsidy Deadline Fears

Web Summary : Driven by subsidy expiry fears, electric vehicle sales soared in March, breaking records. Two-wheeler sales led the charge, with TVS and Bajaj dominating. Over 2.1 million EVs registered in FY26. Consumers rushed purchases fearing price hikes, fueled by discounts before subsidy extension.
टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर