भारतातील सर्वात मोठे EV चार्जिंग स्टेशन; एकाच वेळी चार्ज होतात इतक्या गाड्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 15:21 IST2025-06-27T15:21:24+5:302025-06-27T15:21:49+5:30

Electric Car Charging Station: भारतात गेल्या काही काळापासून इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे.

Electric Car Charging Station: India's largest EV charging station; so many cars can be charged at the same time | भारतातील सर्वात मोठे EV चार्जिंग स्टेशन; एकाच वेळी चार्ज होतात इतक्या गाड्या...

भारतातील सर्वात मोठे EV चार्जिंग स्टेशन; एकाच वेळी चार्ज होतात इतक्या गाड्या...

Electric Car Charging Station: भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे, परंतु त्याचा वेग अजूनही खूपच कमी आहे. याचे कारण म्हणजे, देशात चार्जिंग पायाभूत सुविधांचा अभाव आहे. अजूनही ग्राहक फक्त शहरांतर्गत वाहतुकीसाठीच EV गाड्यांचा वापर करतात. दूरवर जाण्यासाठी या गाड्यांचा वापर होत नाही. या समस्येला दूर करण्यासाठी सरकार आणि कंपन्यांकडून प्रयत्न होत आहेत. याचाच भाग म्हणून, कर्नाटकात देशातील सर्वात मोठे चार्जिंग स्टेशन उभारले गेले आहे. 

भारतात इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या गतीला चालना देण्यासाठी चार्ज झोनने कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये देशातील सर्वात मोठे इलेक्ट्रिक वाहन (EV) चार्जिंग हब सुरू केले आहे. हे हब कर्नाटकातील बेगुरु, चिक्कनहल्ली आणि बंदिकोदगेहल्ली अम्मानिकेरे येथे असून, EV पायाभूत सुविधांच्या बाबतीत देशातील सर्वात मोठ्या आणि सर्वात शक्तिशाली सुविधांपैकी एक आहे. या ठिकाणी एकाच वेळी २०० हून अधिक वाहने चार्ज करता येतात.

या हबमध्ये २१० हून अधिक चार्जिंग पॉइंट्स आहेत, ज्यात ८० DC फास्ट चार्जरसह एकूण १६० DC आणि ५० AC आउटलेट आहेत. एकाच ठिकाणी भारतातील चार्जिंग पॉइंट्सची ही सर्वाधिक संख्या आहे. ४ मेगावॅटपेक्षा जास्त क्षमतेची त्याची एकूण चार्जिंग क्षमता याला देशातील सर्वात शक्तिशाली चार्जिंग सुविधांपैकी एक बनवते.

चार्जिंग स्टेशन २४ तास खुले 
ही सुविधा विशेषतः फ्लीट व्हेईकल्स, बसेस आणि ट्रकच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. येथे वाहने ३५ ते ४५ मिनिटांपर्यंत पूर्णपणे चार्ज करता येतात. तथापि, हा वेळ वाहनाच्या प्रकारावर देखील अवलंबून असतो. हे चार्जिंग हब २४×७ उघडे असते, म्हणजेच इलेक्ट्रिक वाहन युजर्स कधीही चार्जिंगसाठी येऊ शकतात.

स्टेशनवर या सुविधा उपलब्ध 
ईव्ही मालकांच्या सोयी लक्षात घेऊन, स्वच्छ शौचालये, पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि आरामदायी प्रतीक्षा खोल्यांची व्यवस्था देखील केली आहे. इलेक्ट्रिक बसेस आणि ट्रकसारख्या मोठ्या वाहनांसाठी पुरेशी पार्किंग जागा देखील उपलब्ध आहे, जेणेकरून गर्दी किंवा वाहतुकीचा अडथळा होणार नाही. हा प्रकल्प केवळ तांत्रिक कामगिरी नाही तर भारतात ईव्ही चार्जिंग पायाभूत सुविधांच्या कमतरतेवर मात करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. हे नवीन चार्जिंग हब मॉडेल देशाच्या इतर भागातदेखील स्वीकारता येईल.

रिअल टाइम ट्रॅकिंग आणि सुरक्षितता
ही सुविधा चार्ज झोनच्या डिजिटल प्लॅटफॉर्मशी सलग्न आहे. यात अॅप-आधारित एंट्री, रिअल-टाइम ट्रॅकिंग आणि बिल्ट-इन सुरक्षा प्रणाली यासारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. सध्या, चार्ज झोन संपूर्ण भारतात १३,५०० हून अधिक चार्जिंग स्टेशन चालवत आहे. 

Web Title: Electric Car Charging Station: India's largest EV charging station; so many cars can be charged at the same time