बुलेटच्या किमतीत इलेक्ट्रिक कार, मोफत करू शकता बुकिंग!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 12:51 PM2024-01-25T12:51:36+5:302024-01-25T12:52:16+5:30

Yakuza Karishma EV : हरयाणा स्थित Yakuza EV ने एक नवीन इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. 

Cheapest Electric Car : Yakuza Karishma Electric Car Price, Mileage | बुलेटच्या किमतीत इलेक्ट्रिक कार, मोफत करू शकता बुकिंग!

बुलेटच्या किमतीत इलेक्ट्रिक कार, मोफत करू शकता बुकिंग!

नवी दिल्ली : सध्या भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे. त्यामुळे देश आता इलेक्ट्रिक कारचे केंद्र बनत आहे. यातच टाटा मोटर्स एकामागून एक नवीन इलेक्ट्रिक कार लाँच करत आहेत. तर अनेक ग्राहक टेस्ला कारची वाट बघत आहेत. दरम्यान, हरयाणा स्थित Yakuza EV ने एक नवीन इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. 

या कारची किंमत हिरो मोटोकॉर्पच्या करिझ्मा बाईकपेक्षा कमी आहे. जर तुम्ही स्वस्त इलेक्ट्रिक कारसाठी Nano EV ची वाट पाहत असाल तर आता तुम्हाला याची वाट पाहण्याची गरज नाही, कारण Yakuza Karishma EV बाजारात दाखल झाली आहे. ही इलेक्ट्रिक कार 3 सीटर कार आहे, ज्यामध्ये तीन लोक सहज बसू शकतात.

फीचर्स
Yakuza Karishma ही 3 सीटर इलेक्ट्रिक कार आहे. कारचा लुक आणि डिझाइन ग्राहकांना आकर्षित करू शकते. या इलेक्ट्रिक कारमध्ये एलईडी डीआरएल, प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी फॉग लॅम्प, ब्रॉड ग्रिल, क्रोम डोअर हँडल, कनेक्टेड एलईडी टेल लॅम्प, पॉवर विंडो, बॉटल होल्डर यांसारखे फीचर्स आहेत. याशिवाय तुम्हाला सनरूफ, पुश स्टार्ट/स्टॉप बटण, स्पीकर्स, ब्लोअर, इन्स्ट्रुमेंट डिस्प्ले, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा यांसारखी फीचर्स सुद्धा मिळतील.

बॅटरी आणि रेंज
Yakuza Karishma EV कारला 60v42ah बॅटरीमधून पॉवर मिळते. एकदा फुल चार्ज केल्यानंतर ही कार 50-60 किलोमीटर अंतर कापू शकते. ही कार 0 ते 100 टक्के चार्ज होण्यासाठी 6-7 तास लागतील. इलेक्ट्रिक कार चार्ज करण्यासाठी टाइप 2 चार्जर मिळेल. या इलेक्ट्रिक कारचे बुकिंग सुरू झाले असून, कंपनीच्या अधिकृत साइटवर जाऊन बुकिंग करता येईल.

बाईकपेक्षा स्वस्त इलेक्ट्रिक कार
Hero Karizma XMR ची भारतात एक्स-शोरूम किंमत 1.79 लाख रुपयांपासून सुरू होते. Yakuza Karishma ची किंमत बाईकपेक्षा कमी असल्याचे तुम्ही पाहू शकता. जर ग्राहकांना ही कार खरेदी करायची असेल तर ते Yakuza EV च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन बुकिंग करू शकतात.
 

Web Title: Cheapest Electric Car : Yakuza Karishma Electric Car Price, Mileage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.