४.४९ लाखांची BMW इलेक्ट्रिक स्कूटर मिळतेय २.१० लाखांना! लोका उड्या मारतायत, उड्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 15:27 IST2026-02-19T15:26:26+5:302026-02-19T15:27:45+5:30
BMW CE 02 Price Cut India : BMW CE 02 आता २.४० लाखांनी स्वस्त! पहा नवीन किंमत आणि फीचर्स | BMW Electric Scooter Price Cut

४.४९ लाखांची BMW इलेक्ट्रिक स्कूटर मिळतेय २.१० लाखांना! लोका उड्या मारतायत, उड्या...
सध्या यामाहा, रिव्हर इंडीसारख्या कंपन्यांनी दणकट इलेक्ट्रीक स्कूटर आणण्याची तयारी सुरु केली आहे. अशातच प्रिमियम दुचाकी प्रेमींसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. लक्झरी कार आणि बाईक निर्माती कंपनी BMW Motorrad च्या बहुचर्चित CE 02 या इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमतीत मोठी कपात झाली आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
भारतात लाँच झाल्यापासून या स्कूटरच्या किमतीबाबत बरीच चर्चा होती, मात्र आता ग्राहकांना सुखद धक्का देत या स्कूटरवर तब्बल २.४० लाख रुपयांचा डिस्काऊंट दिला जात आहे. एवढी मोठी कपात करण्याचे कारण म्हणजे या स्कूटर कम मोटरसायकलला कोणी गिऱ्हाईकच मिळत नव्हते. यामुळे कंपनीने नाही तर डीलरनी या स्कूटरवर हा डिस्काऊंट देण्यास सुरुवात केली आहे.
आता किती असेल नवी किंमत?
BMW CE 02 जेव्हा भारतात लाँच झाली होती, तेव्हा तिची एक्स-शोरूम किंमत ४.४९ लाख रुपये इतकी होती. मात्र, आता ही स्कूटर अवघ्या २.०९ लाख रुपयांच्या (एक्स-शोरूम) सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध होणार आहे. डीलरस्तरावर हा डिस्काऊंट सुरु असल्याने जुना स्टॉक क्लिअर होताच पुन्हा नवीन स्कूटरवर आधीचीच किंमत लागू होण्याची देखील शक्यता आहे.
BMW CE 02 ची खास वैशिष्ट्ये:
दमदार परफॉर्मन्स: ही स्कूटर अवघ्या ३ सेकंदात ० ते ४५ किमी प्रतितास वेग पकडू शकते.
बॅटरी आणि रेंज: यात १.९६ kWh ची ड्युअल बॅटरी देण्यात आली असून, एकदा चार्ज केल्यावर ती १०८ किमीची रेंज देते.
वेग: या स्कूटरचा टॉप स्पीड ९५ किमी प्रतितास आहे.
फीचर्स: ३.५ इंचाचा TFT डिस्प्ले, USB-C चार्जिंग पोर्ट, की-लेस राईड आणि दोन राईडिंग मोड्स (Flow आणि Surf) यात मिळतात.
लक्झरी ब्रँडची स्कूटर आता बजेटमध्ये येत असल्याने, भारतीय इलेक्ट्रिक दुचाकी बाजारपेठेत मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.