Trapped in a cable lying on the road, the woman crushed by a bus in aurangabad | रस्त्यावर पडलेल्या केबलमध्ये अडकून अपघात, महिलेला बसने चिरडले 
रस्त्यावर पडलेल्या केबलमध्ये अडकून अपघात, महिलेला बसने चिरडले 

औरंगाबाद : व्यायामशाळेत जात असताना रस्त्यावर पडलेल्या केबलमध्ये अडकून दुचाकीस्वार महिलेचा अपघात झाला होता. या अपघातामुळे पाठिमागून वेगात आलेल्या बसने महिलेला चाकाखाली चिरडले. त्यामध्ये, जागीच महिलेचा मृत्यू झाला. जालना रोडवरील रामनगर येथे सकाळी सव्वा आठ वाजता हा दुर्दैवी अपघात घडला.

ललिता शंकर ढगे (३९ रा कासलीवाल पूर्व चिकलठाणा)असे मयत महिलेचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, ललीता यांचे पती शंकर हे वाळूज एमआयडीसीतील कंपनीत व्यवस्थापक आहेत. पतीला सोडल्यानंतर त्या दुचाकीने व्यायामशाळेत निघाल्या होत्या. सव्वा आठ वाजेच्या सुमारास  मागून वेगात आलेल्या कामगारांना घेऊन जाणाऱ्या बसच्या चाकाखाली आल्याने ललीता यांचा जागेवरच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत ललिता यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. ललीला यांच्या मागे पती, मुलगी आणि मुलगा आहे. अपघातानंतर बसचालक बससह घटनास्थळवरुन फरार झाला आहे. दरम्यान, याविषयी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात बसचालकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
 

Web Title: Trapped in a cable lying on the road, the woman crushed by a bus in aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.