शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन सादर होणार झेडपीचा अर्थसंकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:13 IST

अमरावती: जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प येत्या २६ मार्च रोजी झूम मोबाइल ॲप (ऑनलाइन) सभेत सादर केला जाणार आहे. झेडपीच्या ...

अमरावती: जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प येत्या २६ मार्च रोजी झूम मोबाइल ॲप (ऑनलाइन) सभेत सादर केला जाणार आहे. झेडपीच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑनलाइन सभेच्या माध्यमातून अर्थसंकल्प सादर केला जात आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्षांनी सभा, बैठकांवर निर्बंध घातले असून, उपस्थितीवरही मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या जिल्हा परिषदेचे अर्थसंकल्पीय सभा २६ मार्च रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन पार पडणार आहे. झेडपीचे प्रभारी डेप्युटी सीईओ डॉ. विजय रहाटे यांच्या स्वाक्षरीने या सभेबाबतची नोटीस सदस्यांना जारी करण्यात आली आहे. या सभेत सहभागी होणाऱ्या सदस्यांनी झूम ॲप माध्यमातून सभेला हजेरी नोंदवावी लागणार आहे. झेडपी सदस्यांना पंचायत समितीमध्ये बसूनही सभेत सहभागी होण्याची व्यवस्था प्रशासनाने केली आहे. कोरोनामुळे मागील वर्षभरापासून जिल्हा परिषदेला शासनाकडून फारसा निधी मिळाला नसून, जिल्हा परिषदेचे स्वतःचे उत्पन्नही तोकडेच आहे. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात फार मोठ्या घोषणा होण्याची शक्यता कमीच आहे. मागील वर्षीचे मूळ अंदाजपत्रक २३ कोटी रुपयांचे होते. या वर्षीचे सुधारित अंदाजपत्रक किती कोटीची राहील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वित्त विभागाने जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प मान्यतेसाठी अर्थ समितीकडे येत्या २२ मार्च रोजी होणाऱ्या सभेत सादर केला जाणार आहे. अर्थ समितीने मान्यता दिल्यानंतर, हा अर्थसंकपल्प विशेष सभेत ठेवला जाणार आहे. झेडपीचे अर्थ व आरोग्य समितीचे सभापती बाळासाहेब हिंगणीकर हे ऑनलाइन सभेच्या माध्यमातून अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मागील मार्च महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. परिणामी, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी अडचणी आल्यात. या योजनांवर अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी बहुतांश योजना विविध कारणांमुळे पूर्णत्वास जाऊ शकल्या नाहीत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ऑनलाइन सादर होणारा अर्थसंकल्प कसा असेल, त्यातून जनतेच्या अपेक्षांची पूर्ती होणार काय, अशा प्रश्नांची उत्तरे अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मिळणार आहेत.

बॉक्स

मागील काळात पदाधिकारी, प्रशासनाकडून कोरोनामुळे जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढविण्यासाठी फारसे प्रयत्न करता आले नाहीत. त्यामुळे इतर जिल्हापरिषदेच्या तुलनेत अमरावती जिल्हा परिषदेचा यंदाचा अर्थसंकल्प आर्थिकदृष्ट्या दुर्बल असाच ठरणार असल्याचे दिसून येत आहे.