शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

‘झेडपी’त लाल दिव्यासाठी रस्सीखेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2017 00:08 IST

जिल्हा परिषदेत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या काँग्रेसने अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी अद्याप कुणाच्याही नावावर शिक्कामोर्तब झालेले नाही.

छुप्या बैठकी : काँग्रेस,भाजपच्या सत्तेसाठी हालचालीजितेंद्र दखने अमरावतीजिल्हा परिषदेत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या काँग्रेसने अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी अद्याप कुणाच्याही नावावर शिक्कामोर्तब झालेले नाही. किंबहुना काँग्रेस व भाजपने सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्न चालविले आहे. परंतु भाजपने काँग्रेसला सहजासहजी सत्ता जाऊ द्यायची नाही, अशी पडद्याआड रणनीती आखली आहे. त्यामुळे २१ मार्च रोजी ‘दूध का दूध और पाणी का पाणी’ हे स्पष्ट होईल, हे विशेष. काँग्रेसने सर्वाधिक २६ जागा जिंकून जिल्हा परिषदेत पुन्हा ‘पंजा’च अव्वल असल्याचे सिद्ध केले आहे. चार सदस्य सोबत घेताच सत्तास्थापनेसाठी काँॅग्रेसचा मार्ग मोकळा होऊ शकते. प्रारंभी रिपाइंचा १ सदस्य काँॅग्रेसला अगोदरच मित्र म्हणून आला आहे. त्यामुळे काँग्रेस आजमितीला २७ सदस्य संख्येवर वर स्थिरावला आहे. आता काँग्रेसच्या तंबूत केवळ तीन सदस्यांची गरज आहे. दरम्यान राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी काँॅग्रेससोबत आघाडीचे संकेत दिले आहेत. तसेच काँॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीसुध्दा ज्या पक्षाचे सर्वाधिक सदस्य जास्त त्या ठिकाणी त्यांची हे सूत्र लागू केले आहे. परिणामी जिल्हा परिषदेत काँग्रेसला लाल दिव्यापासून सद्यातरी धोका नाही, असे राजकीय चित्र आहे. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच सदस्य निवडून आले आहेत. मात्र पाचही सदस्य दोन गटाचे निवडून आले आहे. त्यामुळे काँग्रेसला सत्ता काबीज करताना राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना विश्र्वासात घेऊन जादुई आकडा गाठावा लागेल. त्याशिवाय सत्तेचे समीकरण जुळणे अवघड असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीचे पाच सदस्य दोन गटात विभागल्या गेले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांना राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेत्यांची मनधरणी करावी लागणार आहे, तर दुसरीकडे भाजपने राष्ट्रवादीच्या नेत्यांना आपल्या तंबूत ओढण्यासाठी वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत. महापालिकेत भाजपला सत्ता मिळाली. जिल्हा परिषदेतही १३ सदस्यांच्या भरोशावर ‘जुगाडबंदी’ करून सत्ता स्थापन करता येते काय? याचे सूक्ष्म नियोजन भाजप करीत आहे. काँग्रेस वगळता अन्य पक्षासोबत भाजप मैत्री करण्याच्या बेतात असल्याचे समजते. परंतु सत्ता काबीज करण्यासाठी ३० सदस्यांची आवश्यता आहे. सद्यस्थितीत जिल्हा परिषदेत काँग्रेस २६, राष्ट्रवादी ५, भाजप १३, शिवसेना ३, प्रहार ५, युवा स्वाभिमान २, रिपाइं-१, बसपा १, अपक्ष १, स्वाभिमानी शेतकरी संघटना १, लढा संघटना १ असे एकूण ५९ सदस्य निवडून आले आहेत. मात्र सत्ता स्थापनेसाठी ३० हा ‘मॅजिक फिगर’ कुणाकडेही नाही. काँग्रेससोबत रिपाइंचे एक सदस्य असल्याने ही संख्या २७ पोहोचली आहे. सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसला चार सदस्यांची आवश्यकता आहे. परंपरागत मैत्री असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत काँग्रेसची युद्धस्तरावर बोलणी सुरू आहे. भाजपला रोखणे हे काँग्रेस- राष्ट्रवादीचा अजेंडा आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादीत आघाडी होऊन सत्ता स्थापन केली जाईल, असे राजकीय चित्र आहे.२०१२ मध्ये बदलेले होते सत्ता स्थापनेचे चित्रजिल्हा परिषदेत गतवेळी सर्वाधिक सदस्य असलेल्या कॉग्रेसला सत्ता स्थापनेच्यावेळी मित्र पक्षाने दगाबाजी करुन सत्ता काबीज केली होती. २०१२ मध्ये काँग्रेसकडे येणारी सत्ता मित्रपक्षाने अभद्र युती करून मिळविली होती. परंतु त्यानंतर सप्टेंबर २०१४ मध्ये शेवटी अडीच वर्षांसाठी सत्ता स्थापनेत काँग्रेसने सावध पवित्रा घेतला. अंतर्गत वाद, हेवेदावे गुंडाळून काँग्रेसने एकहाती सत्ता मिळविली होती. आताही हीच राजकीय खेळी खेळली जाण्याची शक्यता आहे.जिल्हा परिषदेत सर्वाधिक सदस्य काँग्रेसचे आहेत. मात्र सत्तास्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ आमच्याकडे असल्याने कुठल्याही स्थितीत जिल्हा परिषदेवर यावेळीसुद्धा काँग्रेसचीच सत्ता राहील.- बबलू देशमुख,जिल्हाध्यक्ष, काँग्रेसजिल्हा परिषदेत भाजपाकडे सत्तेसाठी स्पष्ट बहुमत नाही. मात्र राजकीय घडामोडींवर आमचे बारकाईने लक्ष आहे. सत्ता स्थापनेसाठी सध्या तरी काही निर्णय नाही. प्रसंगानुरुप भाजप निर्णय घेईल- दिनेश सूर्यवंशी,जिल्हाध्यक्ष, भाजपक्ष