नंदवन कॉलनीत युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:14 IST2021-04-28T04:14:23+5:302021-04-28T04:14:23+5:30

अमरावती : राहत्या घरी एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना फ्रेजरपुरा ठाणे हद्दीतील चपराशीपुऱ्यातील नंदनवन कॉलनी येथे सोमवारी ...

Youth commits suicide by hanging in Nandvan Colony | नंदवन कॉलनीत युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

नंदवन कॉलनीत युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

अमरावती : राहत्या घरी एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना फ्रेजरपुरा ठाणे हद्दीतील चपराशीपुऱ्यातील नंदनवन कॉलनी येथे सोमवारी घडली.

सय्यद समीर अली सय्यद अफसर अली (२२, रा. नंदनवन कॉलनी) असे मृताचे नाव आहे. पोलीस सूत्रांनुसार, मृताचे वडील सय्यद अफसर अली वल्द असगर अली (५२, रा. नंदनवन कॉलनी) यांनी पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. फिर्यादी हे काही कामनिमित्त चांदूर बाजार येथे गेले होते, तर मृतक हा चपराशीपुरा येथे चहा कॅन्टीनवर गेला होता. फिर्यादी परत आल्यानंतर त्यांनी मुलाला फोन केला. पण, त्याने उचलला नाही. त्यानंतर मोठ्या मुुलाने लहान भावाने फाशी घेतल्याची माहिती वडिलांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील शवागारात पाठविला. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Youth commits suicide by hanging in Nandvan Colony