शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक बाटल्यांपासून विद्यार्थ्यांनी बनविली नौका

By admin | Updated: March 8, 2016 00:01 IST

स्थानिक कॅम्प परिसरातील शाश्वत कन्सेप्ट स्कूलच्या इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी मिनरल वॉटरच्या निरुपयोगी बाटल्यांचा वापर करून नाव तयार केली.

अमरावती : स्थानिक कॅम्प परिसरातील शाश्वत कन्सेप्ट स्कूलच्या इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी मिनरल वॉटरच्या निरुपयोगी बाटल्यांचा वापर करून नाव तयार केली. ही नाव केवळ पाण्यावर तरंगतच नाही तर तीत पाच व्यक्ती नौकाविहार करू शकतात. वडाळी तलावात या नावेची यशस्वी चाचणी घेण्यात आली. विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी नौकाविहाराचा आनंद लुटला. शाश्वत कन्सेप्ट स्कूलमध्ये टाकाऊ वस्तू गोळा करण्याची ‘कबाड-जुगाड’ खोली आहे. शाळेतील जुने साहित्य या खोलीत जमा केले जाते. त्या वस्तुंचा वापर करून त्यातून विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीच्या बळावर नवनवे प्रयोग केले जातात. एकूण येथे ‘कचऱ्यातून कला’ निर्माण करण्याचे शिक्षण आणि स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे. कल्पनाशक्तीच्या बळावर येथील विद्यार्थ्यांनी आजवर अनेक प्रयोग केले आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव देण्याचा शाळेचा प्रयत्न असतो. प्लॅटफॉर्मसाठी प्लायवूडचा वापर अमरावती : पाण्याच्या रिकाम्या बाटल्यांपासून नाव तयार करण्याकरिता विद्यार्थ्यांना शाळेचे विज्ञान शिक्षक प्रवीण गुल्हाने यांनी डिझाईन तयार करून दिले. त्यानुसार प्लास्टिकच्या बाटल्या तारांच्या साहाय्याने मजबुतीने बांधण्यात आल्या. एकावर एक असे तीन थर रचून प्लॅटफार्मसाठी त्यावर प्लायवुड टाकण्यात आले. हवेच्या दाबामुळे हा प्लॅटफार्म तरंगतो. त्याला चारही बाजूने आधार देण्यासाठी बाटल्यांचे दोन थर रचण्यात आले. आकर्षकपणा वाढविण्यासाठी विशिष्ट आकार व रंगांच्या बाटल्यांचा कौशल्याने वापर करण्यात आला. या नावेची येथील वडाळी तलावात चाचणी घेण्यात आली. नावेत पाच जणांनी विहार केल्याने नाव अगदी ‘परफेक्ट’ असल्याचे सिध्द झाले. २० विद्यार्थ्यांचा सहभाग, ७०० बाटल्यांचा वापर प्लास्टिक बाटल्यांपासून नाव तयार करण्याच्या प्रयोगात शाळेच्या ७ व्या वर्गातील २० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यासाठी मुलांनीच ७०० बाटल्या गोळा केल्यात. संस्थापक अतुल गायगोले, संचालिका अमृता गायगोले व विज्ञान शिक्षक प्रवीण गुल्हाने यांच्या मार्गदर्शनात नाव तयार करण्यात आली.वडाळी तलावात नौकाविहारमुलांनी तयार केलेल्या या अनोख्या नावेची यशस्वी चाचणी येथील वडाळी तलावात घेण्यात आली. ही नाव पाण्यावर तरंगते. नावेत पाच व्यक्ती बसू शकतात. चाचणीच्यावेळी वडाळी तलाव परिसरात अनेक पर्यटक उपस्थित होते. त्यांनीदेखील या नावेत स्वार होऊन नौकाविहाराचा आनंद लुटला. विद्यार्थ्यांच्या उपजत व सुप्त कलागुणांना वाव देणे व अल्पखर्चात टाकाऊ वस्तूंपासून उपयोगी वस्तू तयार करणे, हे शाश्वत शिक्षण आहे. याच उपक्रमातून मुलांनी कल्पकतेने ही नाव तयार केली आहे. - अतुल गायगोले, संस्थाध्यक्ष, शाश्वत कन्सेप्ट स्कूल, अमरावती