शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘गोल्डन गँग’ शब्द प्रयोगाने गदारोळ

By admin | Updated: March 21, 2015 01:02 IST

काँग्रेसच्या अरूण जयस्वाल यांनी महापालिका सभागृहात ‘गोल्डन गँग’ असा नामोल्लेख केला.

मुद्दा सांस्कृतिक भवनाचा : काँग्रेसचे अरूण जयस्वाल नाराजअमरावती : काँग्रेसच्या अरूण जयस्वाल यांनी महापालिका सभागृहात ‘गोल्डन गँग’ असा नामोल्लेख केला. त्यावर आक्रमक होत बसपाचे गोंडाणे यांनी ‘गोल्डन गँग’ कोण? याचे स्पष्टीकरण देण्याची मागणी केली. यामुळे महापालिका सभागृहात शुक्रवारी ताणातुणीचे वातावरण निर्माण झाले. येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात करारनाम्याच्या अटी-शर्तींचे पालन होत नसल्याचा आरोप करुन कंत्राटदाराला ३० वर्षांची मुदतवाढ देण्याचा प्रकार म्हणजे ‘फिक्सिंग’ आहे. विकासकामांना २ कोटी ६५ लाख रुपये देण्यास कितीही विरोध केला तरी ‘गोल्डन गँग’ हा विषय मंजूर करणारच, असे काँग्रेसचे अरुण जयस्वाल म्हणाले. त्यावर बसपचे अजय गोंडाणे आक्रमक झाले. अखेर स्थायी समितीचे सभापती विलास इंगोले यांनी हस्तक्षेप करून एकेरी भाषेचा वापर टाळण्याचा सल्ला सदस्यांना दिला.महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात शुक्रवारी सर्वसाधारण सभा पीठासीन सभापती महापौर चरणजितकौर नंदा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. उपायुक्त विनायक औगड, नगरसचिव मदन तांबेकर यांनी सहभाग नोंदविला. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनाच्या दुरुस्तीला मंजुरी देण्याच्या विषयाला प्रारंभी काँग्रेसचे सदस्य वसंतराव साऊरकर, अरुण जयस्वाल, अमोल ठाकरे, अ.रफिक, मुस्लिम लिगचे इमरान अशरफी यांनी कडाडून विरोध नोंदविला. जयस्वाल यांनी सांस्कृतिक भवनाच्या करारनाम्याची प्रत सभागृहात झळकविली. सांस्कृतिक भवनाच्या दुरूस्तीसाठी २ कोटी ६५ लाख रुपये देणे नियमबाह्य आहे. करारनाम्यात अशा कोणत्याही प्रकारचा उल्लेख नाही. मात्र, अपहार करण्यासाठीच सांस्कृतिक भवनाच्या कंत्राटाला मुदतवाढ दिली जात आहे. महापालिकेत विशिष्ट काही जण भूखंड वाटप, कंत्राट ठरवीत आहेत.- अरुण जयस्वाल, नगरसेवक.