शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

बडनेऱ्यातील वनकार्यालय शोभेची वास्तू

By admin | Updated: March 9, 2017 00:20 IST

बडनेऱ्यातील सहायक वन परिक्षेत्राधिकारी मुख्यालयाला सतत कुलूपच राहत असल्याने संबंधित तक्रारदारांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागत असल्याची...

कायम कुलूप : शेतकरी, नागरिक त्रस्त, वन्य पशु-पक्ष्यांच्या शिकारीत वाढबडनेरा : बडनेऱ्यातील सहायक वन परिक्षेत्राधिकारी मुख्यालयाला सतत कुलूपच राहत असल्याने संबंधित तक्रारदारांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागत असल्याची ओरड परिसरवासीयांची आहे. नुकत्याच हरीयल पक्ष्याच्या मृत्यूने याला दुजोरा मिळाला आहे. वडाळी परिक्षेत्रांतर्गत बडनेरा नवीवस्तीत सहायक वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालय आहे. बहुतांश लोकांना बडनेऱ्यात वनविभागाचे कार्यालय आहे हे देखील माहित नसल्याची स्थिती आहे. तक्रारदारांना खुप विचारपूस करून या कार्यालयापर्यंत पोहोचावे लागत असल्याचे बोलल्या जात आहे. त्यातच या कार्यालयाला कुलूप लागल्याचे पाहून त्यांचा मन:स्ताप अधिकच वाढतो आहे. विविध प्रकारच्या परवानग्या, तक्रारी घेऊन शेतकरी, व्यापारी या ठिकाणी जात असतात. १२ वाजल्यानंतर निश्चितच आपल्याला कोणीतरी कार्यालयात सापडतील, या आशेने तक्रारदार जात आहेत. मात्र आल्यापावली परतण्याची वेळ त्यांच्यावर येत आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अधिकांश परिसर बडनेरानजीकचा कोंडेश्वर परिसर, म्हसला शिवार, बडनेरा परिमंडळात येतो. पर्यायाने मोठ्या संख्येत तक्रारदार या ठिकाणी येत असतात. नांदगाव तालुक्यात तितर, बटेरच्या शिकारींचे प्रमाण अधिक आहे. त्यासंबंधित गुन्हेदेखील आहेत. नुकतेच बडनेऱ्यात हरियालसह ११ पक्षांच्या मृत्यूने खळबळ उडविली. ही घटना उघडकीस आल्यानंतर तब्बल एक तास उशीराने वनविभागाचे संबंधित अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचलेत. या घटनास्थळापासून हाकेच्या अंतरावर बडनेऱ्यातील वनविभागाचे वर्तुळ कार्यालय आहे. घटनास्थळी परिसरवासीयांनी अमरावतीच्या वडाळी परीक्षेत्र कार्यालयाला संपर्क साधून पक्षांच्या मृत्यूची घटना कळविली. बडनेरा वर्तुळ कार्यालयीन ठिकाणी काही पक्षीमित्र गेले होते. मात्र कार्यालय बंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले. एकूणच वनविभाग आपल्या कामात कितपत गंभीर आहे हे यातून लक्षात येते. बडनेरावासीयांसह परिसरातील नागरिकांमध्ये अशा कारभारावर नाराजी व्यक्त होत आहे. (शहर प्रतिनिधी)शेतकऱ्यांना विविध परवानगी घेण्यासाठी बडनेऱ्यातील वनविभागाच्या कार्यालयात जावे लागते. कार्यालय बंदच राहत असल्याने त्यांना प्रचंड मनस्ताप होत आहे. वरिष्ठांनी याची दखल घ्यावी. - अरुण साकोरे, तालुका अध्यक्ष, शेतकरी संघटना बडनेऱ्यातील वनविभागाचे वर्तुळ कार्यालय बंद राहत असेल तर तशा सूचना संबंधितांना दिल्या जाईल. यावर विशेष करुन लक्ष देऊ कामकाजानिमित्त तेथील कर्मचारी इतरत्र असतात. - एच.व्ही. पडगव्हाणकरआरएफओ, वडाळी वनक्षेत्र