शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शुध्द पाणी पुरवठ्याची जबाबदारी कोणाची?

By admin | Updated: August 13, 2015 00:53 IST

दरवर्षी पावसाळ्यात धरणातील पाण्याची पातळी वाढताच जीवन प्राधिकरणकडून अमरावतीकरांना गढूळ पाण्याचा पुरवठा होऊ लागतो.

गढूळ पाणीपुरवठा कायमच : जलशुध्दीकरण केंद्रावर अधिकाऱ्यांच्या फेऱ्याअमरावती : दरवर्षी पावसाळ्यात धरणातील पाण्याची पातळी वाढताच जीवन प्राधिकरणकडून अमरावतीकरांना गढूळ पाण्याचा पुरवठा होऊ लागतो. हे पाणी आरोग्यासाठी घातक असल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टरांचे असले, तरी ते पिण्यास योग्य असल्याचा दावा प्राधिकरणचे अधिकारी करीत आहेत. गढूळ पाण्यासाठी ठोस पर्याय किंवा उपाययोजनादेखील सुचविली जात नसल्याने पाणी शुध्दतेची जबाबदारी नेमकी कोणाची, हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळेच आता शहरात पूर्ववत शुध्द पुरविण्याकडे पालकमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. गढूळ पाण्यात ‘आयरन बॅक्टेरिया’ व ‘हायड्राआॅक्साईड’चे प्रमाण असते तर दूषित पाण्यामध्ये ‘कोलिफाम’ व ‘थर्मोटॉलरन्स’ हे जिवाणू असल्याचे डॉक्टर व रसायनशास्त्रज्ञांकडून सांगण्यात आले आहे. हे जीवाणू मानवी शरीराला हानी पोहोचवू शकतात. यामुळे उलट्या व अतिसारासारखे आजार बळावतात. शहरात सद्यस्थितीत हे आजार वाढल्याचे चित्र आहे. विविध रुग्णालयांमध्ये उलट्या व अतिसारांच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. इर्विन रुग्णालयात जुलै महिन्याच्या प्रत्येक आठवड्यात ७० ते १०० रुग्ण या आजाराने दाखल होतात. आता नागरिकांनी शुध्दे पाण्यासाठी जावे कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.