शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

नवा अध्यक्ष कोण? जिल्हा परिषदेत एकच चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 06:00 IST

राजकीय मंडळीच नव्हे, तर अधिकाऱ्यांपासून कर्मचाºयापर्यंत सर्वांमध्ये एकच चर्चा होत आहे - कोणता सदस्य अध्यक्ष होणार? नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) या गटातील जिल्हा परिषद सदस्यांची संख्या १६ आहे, तर सर्वसाधारण प्रवर्गात २० पैकी दोन जागा रिक्त असल्याने १८ सदस्य जिल्हा परिषद सभागृहात प्रतिनिधित्व करीत आहेत.

ठळक मुद्देहालचाली गतिमान : नामाप्र सदस्यांची नावे आघाडीवर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव आहे. त्यावरून आता जिल्हा परिषदेत कोणता सदस्य अध्यक्ष होणार, याची चर्चा चवीने दिवसभर ‘मिनी मंत्रालया’त रंगत आहे. प्रत्येकाकडून आपआपल्या परीने नाव पुढे करून तेच अध्यक्ष होऊ शकतात, हे पटवूनदेखील दिले जात आहे.राजकीय मंडळीच नव्हे, तर अधिकाऱ्यांपासून कर्मचाºयापर्यंत सर्वांमध्ये एकच चर्चा होत आहे - कोणता सदस्य अध्यक्ष होणार? नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) या गटातील जिल्हा परिषद सदस्यांची संख्या १६ आहे, तर सर्वसाधारण प्रवर्गात २० पैकी दोन जागा रिक्त असल्याने १८ सदस्य जिल्हा परिषद सभागृहात प्रतिनिधित्व करीत आहेत.विशेष म्हणजे, नागरिकांच्या मागास प्रवर्गातील १६ सदस्य असून, यापैकी काही नावांवर एकमत सुद्धा होताना दिसत आहे, तर राजकीय नातेसंबंध, भविष्यातील राजकीय गणिते पाहून काही आपले मत व्यक्त करत आहेत. अद्याप या भागाला अध्यक्षपद मिळाले नाही म्हणून त्यांनाच अध्यक्षपद मिळेल, अशी चर्चाही जोर पकडत आहेत. कोणी आपला भाग कसा मोठा आणि प्रतिनिधित्व करणारा सदस्य राजकीयदृष्ट्या किती वजनदार आहे, याचीही महती जिल्हा परिषदेतील चर्चेदरम्यान रंगत आहे. त्याआधारे याच सदस्याला अध्यक्षपद मिळू शकते असेही सांगितले जात आहे. अशाप्रकारच्या चर्चा जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर होताच दररोज रंगत आहेत.दरम्यान, अध्यक्षपदासाठी सत्ताधारी काँग्रेस व विरोधी पक्षात असलेल्या भाजपकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. अशातच सद्यस्थितीत पक्षश्रेष्ठी राज्यात सत्तास्थापनेसंदर्भात व्यस्त आहेत. त्यामुळे त्यांच्याकडील व्यक्तीकडे अथवा थेट फोनवर संपर्क करू न मोर्चेबांधणी केली जात आहे, तर काहींनी यापूर्वीच पक्षश्रेष्ठीकडे आपली बाजू मांडली असल्याचेदेखील सांगण्यात येत आहे. जिल्हा परिषदेतील स्ट्राँग सदस्यांची भेट घेऊन अध्यक्षपदावर विराजमान करण्यासाठी हालचाली केल्या जात आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत यामध्ये कोण बाजी मारणार, हे स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद