शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

-तर नॉयलॉन मांज्यामुळे गेला असता तरूणीचा जीव

By admin | Updated: October 13, 2016 00:38 IST

शिकवणी आटोपून मोपेड वाहनाने घरी जात असताना अचानक चेहऱ्यावर नॉयलॉनचा मांजा आला

पोलिसांची कारवाई शून्य : घातक मांजामुळे विद्यार्थिनी जखमी अमरावती : शिकवणी आटोपून मोपेड वाहनाने घरी जात असताना अचानक चेहऱ्यावर नॉयलॉनचा मांजा आला आणि ती विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली. रविवारी सायंकाळी रामपुरी कॅम्प परिसरात ही घटना घडली. सुदैवाने या घटनेत विद्यार्थिनीचे प्राण वाचले. शहरात नॉयलॉनच्या मांज्याची सर्रास विक्री होत असतानाही अद्यापपर्यंत पोलिसांची कारवाई मात्र शून्य आहे. या मांज्यामुळे एखाद्याचा जीव जाण्याची प्रतीक्षा तर पोलीस प्रशासन करीत नाही ना, असा प्रश्न आता अमरावतीकरांना पडला आहे. नॉयलॉनच्या मांज्याने पतंग उडविण्यास शासनाने बंदी घातली आहे. राज्यभरात ही बंंदी कायम आहे. हा मांजा पक्षी व नागरिकांसाठी धोकादायक ठरू शकतो. नॉयलॉनच्या मांजामुळे अनेक जण जखमी झाल्याचे यापूर्वी देखील निदर्शनास आले आहे. हा प्रकार धोकादायक असतानाही शहरातील काही ठिकाणी सर्रासपणे नायलॉन मांजाची विक्री केला जात आहे. शहरातील नमुना, साबणपुरा, रामपुरी कॅम्प आदी ठिकाणी मांजा व पतंगविक्रीची प्रतिष्ठाने आहेत. यापैकी काही ठिकाणचे व्यापारी सर्रासपणे नॉयलॉनच्या मांजाची विक्री सुद्धा करीत आहेत.यामांजात अडकून आजवर अनेक वाहनचालक जखमी झाले आहेत. त्यातच रविवारी रामपुरी कॅम्प परिसरात एक विद्यार्थीनी गंभीर जखमी झाली. तो मांजा विद्यार्थिनीच्या चेहऱ्यावर आल्याने तिच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्यात. जर तो मांजा गळयावर आला असता तर तिचा गळा चिरला गेला असता. चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाल्याने तिला रक्तबंबाळ अवस्थेत इर्विनला दाखल करण्यात आले होते. यापूर्वीच्या घटनामध्येही काही युवक मांज्यामुळे जखमी झाले आहेत. मात्र, त्याकडे गांभिर्याने बघितले गेले नाही. त्यामुळे हिच का पोलिसांची कर्तव्यदक्षता? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. नॉयलॉनचा मांजाची खुलेआम विक्री होत असतानाही पोलीस प्रशासन गप्प का, मांज्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ का, असा सवाल अमरावतीकर नागरिकांच्यावतीने उपस्थित केला जात आहे. नॉयलॉन मांजाची शहरात विक्री होत असेल, तर त्याबाबत कारवाई करण्याचे निर्देश संबंधित ठाण्याला देण्यात येतील.- दत्तात्रय मडंलिक, पोलीस आयुक्त.