शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या ’ २६ अधिकारी-कर्मचाऱ्यांची बडतर्फी केव्हा ?

By admin | Updated: May 27, 2016 00:37 IST

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या २६ अधिकारी-कर्मचऱ्यांना बडतर्फ करण्याचे आदेश शासन दरवर्षी धूळखात पडले.

लाचलुचपत प्रकरणात लालफीतशाही : शिक्षा होऊन मुहूर्त मिळेना अमरावती : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या २६ अधिकारी-कर्मचऱ्यांना बडतर्फ करण्याचे आदेश शासन दरवर्षी धूळखात पडले. त्याची बडतर्फी लालफीतशाहीत अडकली आहे. विशेष म्हणजे लाच घेतल्याचे सिद्ध होऊन या सापळा प्रकरणात शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मात्र त्यानंतर या लोकसेवकांना बडतर्फ करण्यात आलेली नाही. अद्यापपर्यंत शिक्षा झालेल्या सापळा प्रकरणात बडतर्फ न केलेल्या आरोपी सेवकांची खातेनिहाय, वर्गनिहय व परिक्षेत्रनिहाय माहिती एसीबीने जाहीर केली आहे. यामध्ये वर्ग १ चा एक अधिकारी, वर्ग २ चे ६ अधिकारी तर वर्ग ३ च्या सर्वाधिक १७ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. याशिवाय वर्ग ४ आणि अन्य एका लोकसेवकालाही अद्यापर्यंत बडतर्फ करण्यात आलेले नाही. राज्यातील ज्या २६ आरोपी लोकसेवकांना (अधिकारी-कर्मचारी) बडतर्फ करण्यात आलेले नाही त्यात महसूल, भूमि अभिलेख व नोंदणी विभागातील पाच, सार्वजनिक आरोग्य विभाग ३, ऊर्जा विभाग, मराविविकं ३, व वैद्यकीय शिक्षण , उद्योग, उर्जावर व कामगार, म्हाडा, विक्रीकर, समाज कल्याण, नगर परिषद, नगर विकास, उच्च व तंत्र शिक्षण विभाग व राज्य परिवहन विभागातील प्रत्येक एका आरोपी लोकसेवकाचा समावेशही आहे. (प्रतिनिधी) सर्वाधिक १६ आरोपी पुणे परिक्षेत्रातील न्यायाल्याने शिक्षा ठोठावल्यानंतरही सापळा प्रकरणाशी संबंधित २६ अधिकारी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यास शासनाला वेळ मिळालेला नाही. यात मुंबई परिक्षेत्रातील २, ठाणे, औरंगाबाद आणि नाशिक परिक्षेत्रातील प्रत्येकी १, नागपूरमधील ३, अमरावतीमधील २ व पुणे परिक्षेत्रातील १६ आरोपींचा समावेश आहे.