शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

आपण बहीण भाऊ, शिकार मिळून खाऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 05:00 IST

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अति संरक्षित समजल्या जाणाऱ्या जंगलात वाघांची संख्या वाढली असल्याचे वृत्त आहे. चिखलदरा नगर परिषद अंतर्गत मरियमपूर वॉर्ड येतो. गत आठवड्यात चिखलदरा सेमाडोह मार्गावर वाघाने एका म्हशीची शिकार केली होती. सायंकाळी सात वाजता एका उंच टेकडीवर केलेली ही शिकार जबड्यात फरफटत नेत असताना रस्त्यावर कोसळली. वाघाने पुन्हा रस्त्यावर येऊन शिकार ओढत नेली.

नरेंद्र जावरे।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा/ चिखलदरा : एकाने म्हशीची शिकार केली आणि दोन दिवस चौघांनी मिळून त्यावर यथेच्छ ताव मारला. विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा परिसरात स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनाही वाघाचे दर्शन होत असल्याने तो कुतूहलाचा विषय ठरला आहे.मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अति संरक्षित समजल्या जाणाऱ्या जंगलात वाघांची संख्या वाढली असल्याचे वृत्त आहे. चिखलदरा नगर परिषद अंतर्गत मरियमपूर वॉर्ड येतो. गत आठवड्यात चिखलदरा सेमाडोह मार्गावर वाघाने एका म्हशीची शिकार केली होती. सायंकाळी सात वाजता एका उंच टेकडीवर केलेली ही शिकार जबड्यात फरफटत नेत असताना रस्त्यावर कोसळली. वाघाने पुन्हा रस्त्यावर येऊन शिकार ओढत नेली. चिखलदरा सेमाडोह मार्गावर स्थानिक रहिवासी आणि जंगल सफारीसाठी ये-जा करणाऱ्यांनी हा दुर्मिळ योग कॅमेराबध्द केला होता. दोन महिन्यापूर्वी सुद्धा एका रानडुकराच्या शिकारीनंतर परिसरातील शिवसागर पॉइंट जंगलात पर्यटकांना या वाघांनी दर्शन दिले होते. शिकारीनंतर मारलेला ताव वनविभागाच्या कॅमेऱ्यात ट्रॅप झाला.चौघांनी मारला दोन दिवस तावशिकार केलेल्या त्या म्हशीवर चार वाघांनी जंगलात नेऊन सतत दोन दिवस ताव मारला. व्याघ्रप्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी म्हशीची शिकार झाल्याचे समजताच त्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावले होते. त्यात वाघ कैद झाले आहेत. शिकारीवर ताव मारताना परिसरात वाघाची गुंज ऐकू येत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.वाघीण तिचे छावे सोबत वाघ?चार वाघ एकसोबत राहत नाहीत. वाघिन आणि तीन छावे किंवा वाघ वाघीण आणि दोन छावे असा हा परिवार असावा, असे मत मानद वन्यजीव रक्षक जयंत वडतकर यांनी ‘लोकमत'ला सांगितले. वाघाचे छावे दोन वर्ष किंवा शिकार करण्यापर्यंत वाघिनीसोबत राहतात तर दोन वाघ सोबत एकच परिक्षेत्रात राहत नाहीत. हे विशेष.

टॅग्स :Tigerवाघ