शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

वीज पुरवठ्याची प्रतीक्षा, तीन वर्षांनी १० हजारांचे बिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:22 IST

फोटो - वरूड ०३ एस डिपॉझिट भरल्यानंतर शेतकऱ्याला हेलपाटे, कार्यकारी अभियंत्याकडे केली कारवाईची मागणी वरूड : कृषिपंपाच्या वीज जोडणीसाठी ...

फोटो - वरूड ०३ एस

डिपॉझिट भरल्यानंतर शेतकऱ्याला हेलपाटे, कार्यकारी अभियंत्याकडे केली कारवाईची मागणी

वरूड : कृषिपंपाच्या वीज जोडणीसाठी डिपॉझिट भरल्यानंतर तीन वर्षांपासून शेतकऱ्याची पायपीट सुरू आहे. तीन वर्षांनंतरही त्यांना वीज पुरवठा मिळाला नसला तरी महावितरणच्या कार्यकारी अभियंता कार्यालयाकडून १० हजारांचे बिल असल्याचे सांगण्यात आले. ते त्यांना प्राप्तदेखील झाले. या अनागोंदी कारभाराबाबत शेतकऱ्याने मोर्शी उपविभागातील कार्यकारी अभियंत्यांकडे लेखी तक्रार देऊन कारवाईची मागणी केली आहे.

तालुक्यातील ममदापूर येथील शेतकरी सुधाकर महादेव टेकोडे यांच्यावर हा प्रसंग गुदरला. ममदापूर शिवारातील गट क्र. ८४ मध्ये त्यांच्या शेतावर विहीर आहे. त्यावरून कृषिपंपाद्वारे पिकांना सिंचनाकरिता २०१६ मध्ये वीज पुरवठा घेण्याकरिता अर्ज केला होता. अर्ज मंजूर झाल्यानंतर २०१७ मध्ये अनामत रक्कमसुद्धा त्यांनी भरली. परंतु, हिवरखेड येथील महावितरण कार्यालयाकडून अद्याप त्यांच्या वीज जोडणीसाठी काहीही करण्यात आले नाही. तीन वर्षांत त्यांनी कार्यालयात वारंवार चकरा घातल्या, उंबरठे झिजविला. शेतातील पिकांचे ओलिताअभावी मोठे नुकसान झाले. अखेर सुधाकर टेकोडे यांनी मोर्शी उपविभागातील कार्यकारी अभियंता कार्यालय गाठले. यावेळी तुमचे कनेक्शन दिले असून, तुमच्याकडे १० हजार ३०० रुपयांचे बिल आहे, असे सांगून सुधाकर टेकोडे यांच्या हाती थेट बिल देण्यात आले.

तीन वर्षे होऊनसुद्धा वीज पुरवठा मिळाला नाही, मात्र थेट बिल हाती आल्याने सुधाकर टेकोडे यांना आश्चर्याचा धक्काच बसला. याबाबत चौकशी होऊन दोषीविरुद्ध कारवाई करण्याची मागणी तक्रारकर्ते शेतकरी सुधाकर टेकोडे यांनी २६ फेब्रुवारी रोजी कार्यकारी अभियंत्यांसह जिल्हाधिकारी आणि अमरावती येथील मुख्य कार्यकारी अभियंत्यांना लेखी तक्रार दिली.

-----------

बेमुदत उपोषण करणार

तीन वर्षांपासून महावितरणचे उंबरठे झिजवत आहे. वीज पुरवठा मिळण्या०वजी बिल हाती देण्यात आले. याप्रकरणी बेमुदत उपोषण छेडणार आहे.

- सुधाकर टेकोडे, ममदापूर