शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पीक विम्याची प्रतीक्षा

By admin | Updated: February 26, 2016 00:29 IST

सध्याची पीक विमा योजना प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या निकषांवर आधारित असून यातील निकष शेतकऱ्यांसाठी जाचक असल्याने केंद्र सरकारने नवीन राष्ट्रीय पीक विमा योजनेची घोषणा केली आहे.

परिपत्रक अद्याप निघाले नाही : कृषी अधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांमध्ये नव्या निकषांबाबत उत्सुकता अमरावती : सध्याची पीक विमा योजना प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या निकषांवर आधारित असून यातील निकष शेतकऱ्यांसाठी जाचक असल्याने केंद्र सरकारने नवीन राष्ट्रीय पीक विमा योजनेची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना अधिकाधिक दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची जाहिरातबाजी सुरू असली तरी प्रत्यक्षात याचे परिपत्रक अजूनही निघालेले नाही. त्यामुळे कृषी अधिकाऱ्यांसह शेतकरीही सुधारित राष्ट्रीय पीक विमा योजनेच्या प्रतीक्षेत आहेत. नैसर्गिक लहरीत शेतीला हवामानाचा फटका बसतो. अशा स्थितीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी सरकारने कृषिपीक विमा योजना सुरू केली. मात्र योजनेचे निकष शेतकऱ्यांसाठी याचक व विमा कंपन्यासाठी पोषक असल्याचा आक्षेप आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तर हे निकष नेहमीच अडचणीचे ठरले आहेत. पिकांचे नुकसान एकूण सरासरीच्या ८० टक्कयांपेक्षा अधिक असल्याशिवाय शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी हफ्त्यापोटी भरलेली रक्कमही बुडीत जाते, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. या जाचक निकषांमुळे सन २०१४-१५ या वर्षात जिल्ह्यातील एकाही शेतकऱ्याने पीक विम्यासाठी कृषी विभागाकडे अर्ज भरला नाही. रब्बी हंगामासाठी ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत मुदत शेतकऱ्यांना होती. मात्र एकाही शेतकऱ्याने रबीसाठी अर्ज भरला नाही. दुष्काळ, अतिवृष्टी, रोगराई आदी कारणांमुळे शेतीचे नुकसान झाल्यास शेतकरी ज्या महसूल मंडळातील आहे. त्या मंडळाच्या सरासरी नुकसानीच्या आकडेवारीवर शेतकऱ्यांचे नुकसान अवलंबून होते. या पद्धतीमुळे एखाद्या शेतकऱ्यांचे ९० टक्के नुकसान झाले असले तरीही त्याला पीक विम्याचा फायदा होत नव्हता. यासाठी सुधारित राष्ट्रीय पीक विमा योजनेत प्रत्येक गावातील उंबरठानिहाय पाहणी केली जाईल. याचा शेतकऱ्यांना थेट फायदा होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे कृषी अधिकाऱ्यासह शेतकरीही सुधारित पीक विमा योजनेच्या प्रतीक्षेत आहेत. (प्रतिनिधी)