शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पांढऱ्या सोन्याला मुहूर्ताची प्रतीक्षा

By admin | Updated: October 25, 2014 22:32 IST

यंदाच्या खरीप हंगामापासून कापूस, सोयाबीन ही पिके शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरली होती. मात्र दोन्ही पिकांना फटका बसण्याच्या स्थितीमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. आधीच मुगापाठोपाठ सोयाबीनचे

अमरावती : यंदाच्या खरीप हंगामापासून कापूस, सोयाबीन ही पिके शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरली होती. मात्र दोन्ही पिकांना फटका बसण्याच्या स्थितीमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. आधीच मुगापाठोपाठ सोयाबीनचे एकरी उत्पादन घटले. दिवाळी सण आला तरी कापसाचा मुहूर्त नाही. अशातच रबी हंगामातील हरभरा पेरणीत शेतकरी जवळील पैसा खर्च करून बसला आहे. त्यामुळे प्रकाश देणाऱ्या दिवाळीत आर्थिकबाबतीत खचलेल्या शेतकऱ्यांसाठी ही दिवाळी अंधारात गेल्याची भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. यंदा शेतीच्या हंगामात आजपर्यंतचा पावसाचा लहरीपणा शेती पिकांना प्रभावित करणारा ठरला आहे. कोरडवाहू खारपाणपट्ट्यात सध्या कापसाचा बोंड परिपक्व होत आहेत. त्यामुळे दिवाळीत यावर्षी अशा शेतकऱ्यांच्या घरी जुन्याच कापसाच्या वातीचे दिवे पेटविण्यात आले. अद्यापही शेतकऱ्यांच्या घरी यंदाचा कापूस आला नाही. शेतात अद्याप सीतादहीसुद्धा झालेली नाही. शेतकऱ्यांना हंगामाच्या सुरुवातीलाच पिकांसाठी वेगवेगळ्या बाबींवर आर्थिक खर्च करावा लागला. अशातच कपाशीवर रसशोषक किडीचा प्रादुर्भाव जाणवत होता. एकीकडे कीटकनाशकाची फवारणी सुरू होती. दुसरीकडे संरक्षित सिंचनाची सोय असलेले शेतकरी कापसाला तुषार सिंचनाद्वारे पाणी देत होते. काही दिवसांनंतर पावसाचा फेर सुरू झाला. त्यामुळे कपाशी पिकाच्या मशागतची कामे ठप्प झाली. शेतीत पाणी साचले होते. डवरे व निंदण न झाल्यामुळे कपाशीच्या वाढीवर परिणाम झाला होता. हे पावसाचे वातावरण संपताच कपाशीवर फुलकिडे, तुडतुडे, पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव झाला होता. आता कपाशीची पाने लाल्यामुळे जळत आहेत. आधीच खरीप हंगामातील पहिल्यांदाच उत्पादन देणाऱ्या मूग पिकाने शेतकऱ्यांना दगा दिला आहे. यानंतर सोयाबीन सवंगणी व तयार करण्याची कामे सध्या सुरू आहेत. मात्र वातावरणाचा फटका या पिकाला बसला आहे. शेंगातील दाणे साबुदाण्याच्या आकाराची असल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे अशा सोयाबीनचे घटलेले उत्पादन व त्याला बाजारात मिळणारा कमी भाव यामुळे शेतकरी विवंचनेत सापडले आहेत. (प्रतिनिधी)