शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

विद्याविहार कॉलनीत देहविक्रय अड्ड्यावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 6:00 AM

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या पुरुषांमध्ये मनोज महादेवराव सोनोने (४०, रा. सावरखेडा ता. मोर्शी) सह १६ वर्षीय अल्पवयीन मुलगा, परतवाडा येथील ३५ वर्षीय, बेलपुरा येथील ३० वर्षीय आणि प्रवीणनगरातील ३२ वर्षीय महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ज्या घरात हा व्यवसाय सुरू होता, ती महिला या गैरकृत्याची मास्टरमाइंड असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ठळक मुद्देपोलिसांकडे यापूर्वी केली होती तक्रार : चार महिलांसह सहा जण ताब्यात; एक अल्पवयीन, अनेक वर्षांपासून सुरू होता प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राजापेठ ठाण्याच्या हद्दीतील विद्याविहार कॉलनीत एका घरात थाटलेल्या देहविक्री अड्ड्यावर राजापेठ पोलिसांनी गुरुवारी धाड टाकून चार महिलांसह सहा जणांना ताब्यात घेतले. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. ही कारवाई गुरुवारी दुपारी २ वाजता दरम्यान करण्यात आली. अनेक वर्षांपासून गोरखधंदा येथे सुरू आहे. नागरिकांनी ठाण्यात धाव घेऊन माहिती दिल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली.पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या पुरुषांमध्ये मनोज महादेवराव सोनोने (४०, रा. सावरखेडा ता. मोर्शी) सह १६ वर्षीय अल्पवयीन मुलगा, परतवाडा येथील ३५ वर्षीय, बेलपुरा येथील ३० वर्षीय आणि प्रवीणनगरातील ३२ वर्षीय महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ज्या घरात हा व्यवसाय सुरू होता, ती महिला या गैरकृत्याची मास्टरमाइंड असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याविरुद्ध कलम १५१ अन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे.विशेष म्हणजे, देहविक्रीच्या या अड्ड्याला परिसरातील नागरिकांचा अनेक वर्षांपासून विरोध सुरू होता. पोलिसांकडे याबाबत अनेकदा तक्रारीसुद्धा नागरिकांनी केल्या होत्या. गुरुवारी नागरिकांच्या संयमाचा बाण सुटला व नागरिकांनीच एकत्र येवून सदर देहविक्री करणाऱ्या महिलांना व त्या ठिकाणी आलेल्या ग्राहकांना पोलिसांच्या मदतीने पकडून देऊन या व्यवसायाचा पर्दाफाश केला. सदर महिला व मुले अनैतिक कृत्य करण्याच्या उद्देशाने येथील महिलेच्या घरात गेले होते, अशी लेखी तक्रारही नागरिकांनी राजापेठ पोलिसांकडे केली आहे. बाहेरील महिलांना व मुलींना आणून त्यांच्याकडून घरात देहविक्रीचा व्यवसाय करून घेतला जातो. सदर महिलेवर कठोर कारवाई करण्यात यावी व देहविक्रीच्या या प्रकाराला परिसरात कायमचा पायबंद घातला जावा, अशी मागणी पोलीस ठाण्यात धडकलेल्या नागरिकांनी केली. या घटनेची परिसरात चर्चा सुरू असून, पोलीस या प्रकारावर कितपत अंकुश ठेवणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. या प्रकारावर कायमस्वरुपी पायबंद घालण्यात यावे, याकरिता परिसरातील रहिवाशांनी पोलिसांना अनेकदा निवेदन दिल्याचे सांगण्यात आले.अनोळखी ग्राहकांचा वावरसदर महिलेच्या घरात दिवसा तसेच रात्रीदेखील अनोळखी व्यक्तींचा वावर राहात होता. डोळ्यादेखत सुरू असलेल्या या प्रकाराला नागरिकसुद्धा त्रासले होेते. परिसरात नागरिकांना गर्भनिरोधक साधने इतस्त: पसरलेली दिसायची. आपल्या लहानग्यांवर त्याचा वाईट परिणाम होऊ नये म्हणून नागरिकच हे साहित्य पेटवून देत होते.यापूर्वी दोनदा धाडीयापूर्वी दोनदा पोलिसांनी सदर घरावर धाडी टाकल्या तरी हा अड्डा सुरूच राहिला. त्यामुळे नागरिकांनी शहर पोलीस आयुक्तांकडेही तक्रार दिली होती. याच घरापुढे लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयाचे फुटेज जप्त करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.नागरिकांची धडकसदर प्रकार असह्य झाल्याने गुरुवारी दुपारी नागरिकांनी राजापेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. रोशन देशमुख, संजय रायकर, राजेश जगताप, भूषण कहाळे आदींनी तक्रार नोंदविली. कठोर कारवाई न केल्यास वरिष्ठांकडे तक्रार नेऊ, असे या नागरिकांचे म्हणणे होते.विद्याविहार कॉलनीतील एका महिलेच्या घरात गैरप्रकार सुरू असल्याची नागरिकांकडून माहिती प्राप्त झाली. धाड टाकून घरमालकिणीसह इतर तीन महिलांना व एका पुरुषाला ताब्यात घेऊन प्रतिबंधक कारवाई केली आहे.- किशोर सूर्यवंशी,ठाणेदार,राजापेठ पोलीस स्टेशनविद्याविहार कॉलनीत महिलेच्या घरात गेल्या अनेक महिन्यांपासून गैरकृत्य सुरू होते. नागरिकांनी हा प्रकार पोलिसांना कळवला. त्यांनी धाड टाकून सदर महिलांना ताब्यात घेतले. मात्र, हा प्रकार पूर्णपणे बंद व्हावा अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे.- प्रशांत जाधव,सामाजिक कार्यकर्ता

टॅग्स :Policeपोलिस