शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सात तास टॉवरवर वीरुगिरी

By admin | Updated: July 8, 2014 23:13 IST

शेतामध्ये सुरु असणाऱ्या टॉवर लाईनच्या कामामुळे होणाऱ्या नुकसानामुळे त्रस्त शेतकऱ्यांनी मंगळवारी दुपारी प्रहार संघटनेच्या नेतृत्वात टॉवरवर चढून तब्बल सात तास ‘वीरुगिरी’ आंंदोलन केले.

अमरावती : शेतामध्ये सुरु असणाऱ्या टॉवर लाईनच्या कामामुळे होणाऱ्या नुकसानामुळे त्रस्त शेतकऱ्यांनी मंगळवारी दुपारी प्रहार संघटनेच्या नेतृत्वात टॉवरवर चढून तब्बल सात तास ‘वीरुगिरी’ आंंदोलन केले. नांदगाव पेठ येथील औद्योगिक वसाहत परिसरातील सोफिया विद्युत प्रकल्पाच्या टॉवर लाईनचे काम सुरु आहे. या टॉवरचे काम आष्टी, वायगाव, जावरा, कामनापूर आणि वलगाव या परिसरातही सुरुआहे.'शेती कामे खोळंबलीया कामामुळे टॉवरवरची विद्युत लाईन अनेक शेतकऱ्यांच््या शेतीमधुन गेली आहे. विद्युत तार टाकण्याचे काम सुरु असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये विद्युत तारा खाली पडुन आहे. त्यामुळे शेतीची कामे खोळंबली आहे. या विद्युत तारा उचलण्यात याव्या अशी मागणी मागील काही महीन्यापासुन शेतकरी करीत आहे.याकरीता शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्यातही तक्रार केली आहे.मात्र अद्यापही कोणतीही कारवाई केली गेली नाही. आता पावसाळ्याच्या सुरुवातीला शेतीमध्ये पेरणी करण्याचे काम सुरु आहे.मात्र शेतात पडलेल्या विद्युत तारेमुळे पाच गावामध्ये असणाऱ्या शेतातील पेरणीचे कामे खोळबंली आहे. अनेक वेळा निवेदने व तक्रारीकरुनही विद्युत तारा उचलल्या जात न गेल्याने मंगळवारी सकाळी ८.४५ वाजता प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष छोटु वसु यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी वायगावातील टॉवरवर चढुन विरुगीरी आंदोलन सुर केले.जोपर्यंत टॉवर लाईनचे तारा हटविण्यात येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याची घोषणा प्रहार कार्यकर्त्यांनी केली. या आंदोलनाची माहिती वलगाव पोलीसांना मिळताच पोलीसाचा ताफा वायगावात दाखल झाला. पोलीसांनी आंदोलनकर्त्यांना टॉवरवरुन खाली उतरविण्याचे प्रयत्न केले मात्र आधी विद्युत तारा उचला व नुकसान भरपाई द्या अशी मागणी प्रहार कार्यकर्त्यांनी रेटुन धरली होती. पोलीसांनी या आंदोलनात दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्यास टॉवरवरुन उडी टाकण्याची धमकी आंदोलनकर्त्यानी यावेळी दीली.शेवटी दुपारी ४ वाजता दरम्यान इंडिया बुल कंपनीचे अधिकारी व तहसीलदार यांच्या निर्देशाहुन पटवारी व अन्य अधिकारी घटनास्थळी पोहोचले. दोन दिवसाच्या आत शेतकऱ्यांना शेतीचे सर्व्हेक्षण करुन नुकसान भरपाई देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आल्यावर आंदोलनकर्ते टॉवरहुन खाली उतरले.