शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन अर्ज भरून देणारी वाहने आरटीओ आवारातून काढली बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 05:01 IST

आरटीओच्या आतील परिसरात ऑनलाईन अर्ज भरून देणारी वाहने लागल्यास चालकांवर कारवाई करून अशी वाहने पोलिसांच्या ताब्यात देण्यात येतील, असे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी बजावले आहे. आरटीओत नेहमीच बाहेरील दलालांचा सुळसुळाट असतो तसेच येथे ३० ते ४० ओम्नी व्हॅन उभ्या ठेवून त्यात ऑनलाईन अर्ज भरून देण्याचा व्यवसाय थाटला होता. आरटीओत कुठलेही काम असो, या एजंट कम दलालांकडेच नागरिकांना संपर्क साधावा लागत होता.

संदीप मानकरलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आरटीओ परिसरात ऑनलाईन अर्ज भरून देणारी अनाधिकृत ओम्नी वाहनरूपी स्टॉल प्रादेशिक परिवहन अधिकारी रामभाऊ गिते यांनी कारवाईचा बडगा उगारत बाहेर काढले. या वाहनांनी आरटीओची जागा व्यापली होती. यासंदर्भात बुधवारच्या अंकात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित होताच कारवाईचा बडगा उगारण्यात आला. आरटीओच्या आतील परिसरात ऑनलाईन अर्ज भरून देणारी वाहने लागल्यास चालकांवर कारवाई करून अशी वाहने पोलिसांच्या ताब्यात देण्यात येतील, असे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी बजावले आहे. आरटीओत नेहमीच बाहेरील दलालांचा सुळसुळाट असतो तसेच येथे ३० ते ४० ओम्नी व्हॅन उभ्या ठेवून त्यात ऑनलाईन अर्ज भरून देण्याचा व्यवसाय थाटला होता. आरटीओत कुठलेही काम असो, या एजंट कम दलालांकडेच नागरिकांना संपर्क साधावा लागत होता. आरटीओत कामानिमित्त येणाऱ्या वाहनचालकांना वाहने ठेवायलासुद्धा जागा शिल्लक नव्हती. नजर टाकावी तेथे एजंटांनी आरटीओची जागा व्यापून घेऊन आपला व्यवसाय थाटला होता. हा प्रकार ‘लोकमत’ने लोकदरबारात मांडताच प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी ही वाहने बाहेर काढण्याचे आदेश एआरटीओ व संबंधित मोटर वाहन निरीक्षकांना दिले. त्यानुसार गुरुवारी कारवाई  करण्यात आली.आरटीओ कार्यालयाच्या परिसरात एजंटांनी वाहने लावण्यास सुरुवात केल्याने कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना अधिकाऱ्यांशी संपर्क करणे दुरापास्त झाले होते. यावर वृत्त प्रकाशित करताच याची दखल घेत ही कार्यवाही करण्यात आली, हे विशेष.

 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस