शहरात आठ केंद्रांवर आज लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:14 IST2021-05-20T04:14:15+5:302021-05-20T04:14:15+5:30

आयसोलेशन दवाखाना, दसरा मैदान येथील केद्रांवर दिव्यांग व्यक्तींसाठी आणि ७० वर्षांवरील व्यक्तींसाठी ५० डोस राखीव ठेवण्यात आले आहे. ...

Vaccination today at eight centers in the city | शहरात आठ केंद्रांवर आज लसीकरण

शहरात आठ केंद्रांवर आज लसीकरण

आयसोलेशन दवाखाना, दसरा मैदान येथील केद्रांवर दिव्यांग व्यक्तींसाठी आणि ७० वर्षांवरील व्यक्तींसाठी ५० डोस राखीव ठेवण्यात आले आहे. याशिवाय को-व्हॅक्सिनचा दुसरा डोस मनपा दवाखाना मोदी हॉस्पिटल बडनेरा, आयसोलेशन दवाखाना, दंत महाविद्यालय, डॉ.पंजाबराव देशमुख महाविद्यालय, हरिभाऊ वाठ दवाखाना, जुनीवस्ती, बडनेरा येथे लस दिली जाणार आहे. ४५ वर्षे व त्यापेक्षा अधिक वयोगटातील ज्या नागरिकांना कोविशिल्ड‍चा पहिला डोज घ्या‍यचा आहे अशा नागरिकांसाठी गुरुवारी सकाळी ९ ते ५ या वेळेत देण्यात येणार आहे. ७० टक्के ऑनलाईन पध्दतीने, तर ३० टक्के टोकन पध्दतीने नोंदणी करण्यात येणार आहे. ४५ वर्षांवरील वयोगटातील नागरिकांनी लस घेण्यासाठी या कोविन पोर्टलवर रीतसर नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी केलेल्या ४५ वर्षांवरील वयोगटातील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. ही नोंदणी झाल्यानंतर पोर्टलवर सोयीनुसार लसीकरण केंद्र निवडून त्याठिकाणी दिनांक निवडून आपली अपॉईंटमेंट आरक्षित करावयाची आहे आणि त्या वेळेला त्या केंद्रावर जाऊन लस घ्यावयाची आहे. २० मे साठी ऑनलाईन नोंदणी सकाळी ७ वाजता, तर टोकन पध्दत ८.३० वाजता सुरू होणार आहे. कोविशिल्ड या लसीचा पहिला डोस मनपा दवाखाना भाजीबाजार, यंग मुस्लिम सो.असो. नागपुरी गेट, मनपा दवाखाना मसानगंज, शहरी आरोग्य केंद्र महेंद्र कॉलनी, दंत महाविद्यालय, शहरी आरोग्य केंद्र दस्तुरनगर, डॉ.पंजाबराव देशमुख महाविद्यालय, केंद्रावर देण्यात येणार आहे. याशिवाय नर्सिंग ट्रेनिंग सेंटर या केद्रांवर कोव्हॅक्सिनचा ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी दुसरा डोस देण्यात येणार आहे.

Web Title: Vaccination today at eight centers in the city