शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, रोजगाराच्या संधी

By admin | Updated: September 10, 2016 00:20 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातंर्गत येणाऱ्या पाचही जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी....

कुलगुरुंचा पुढाकार : पाच जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना लाभअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातंर्गत येणाऱ्या पाचही जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी पुढाकार घेतला. प्रौढ व निरंतर शिक्षण आणि विस्तार सेवा विभागाच्यावतीने टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेसद्वारा कौशल्यावर आधारित प्रमाणपत्र अभ्यासक्रम लकवरच सुरू होणार आहे. या प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांना रोजगाराचे दालन उपलब्ध होतील.शिक्षणासह विद्यार्थ्यांना रोजगार मिळणे गरजेचे आहे. विद्यार्थी केंद्रित विद्यापीठ व्हावे, या दृष्टीने विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना सुरू करण्यात येणार आहेत. विद्यापीठ परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यांतील प्रत्येक तालुक्यांत कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, याकरिता कुलगुरूंनी सकारात्मक पाऊल उचलले आहे. प्रत्येक तालुक्यात एका महाविद्यालयाची निवड विद्यापीठाव्दारे होणार असून त्याठिकाणी २० दिवसांचा प्रशिक्षण वर्ग टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेसद्वारा (टीसीएस) आयोजित केली जाणार आहे. १०० तासांचा असलेल्या प्रशिक्षण वर्गात दररोज ५ तास विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी मिळण्याकरिता कुशलतेचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. ६० विद्यार्थ्यांची प्रशिक्षण वगार्साठी निवड होणार असून २० दिवसांचा प्रशिक्षण कालावधी संपल्यानंतर २१ व्या दिवशी सहभागी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन टाटा कंपनीमध्ये रोजगारासाठी निवडले जाणार असल्याची माहिती प्रौढ व निरंतर शिक्षण आणि विस्तार सेवा विभागाचे श्रीकांत पाटील यांनी दिली. प्रायोगिक तत्त्वावर अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर, अकोला आणि परतवाडा येथे टी.सी.एस. द्वारा प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहे. लवकरच पाचही जिल्ह्यांतील ५६ तालुक्यांत ‘इंफर्मेेटीव्ह अ‍ॅक्शन ट्रेनिंग प्रोग्राम’ सारखे प्रशिक्षण वर्ग सुरू होणार आहे. त्यात इंग्रजी संवाद, स्मरणशक्ती, शब्दसमूह, कौशल्य विकास, मुलाखततंत्र, व्यक्ती परिचय, लेखन कौशल्य अशा अनेक विषयांचा अंतर्भाव राहील. कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांना नोकरीची अनंत संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने टीसीएस प्रशिक्षण सारखे उचललेले पाऊल स्वागतार्थ असून शैक्षणिक क्षेत्रातून कुलगुरुंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.