शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अनन्वित छळामुळे खचले होते रूपालीचे धैर्य!

By admin | Updated: October 6, 2014 23:04 IST

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील खोडगाव येथील विवाहिता रूपाली तुरखडे मृत्युप्रकरणी अखेर गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी रूपाली निघून गेलीय, तिच्या सासरच्या मंडळींनी पैशांसाठी तिचा काटा काढलाय,

काकांचा टाहो : सासरच्यांना धडा शिकवाच!अमरावती : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील खोडगाव येथील विवाहिता रूपाली तुरखडे मृत्युप्रकरणी अखेर गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी रूपाली निघून गेलीय, तिच्या सासरच्या मंडळींनी पैशांसाठी तिचा काटा काढलाय, हे सत्य पचविणे अद्यापही तिच्या माहेरच्या मंडळींना जड जात आहे. रूपालीवर लग्नापासून सात वर्षांत झालेले अन्याय आणि शारीरिक व मानसिक छळाचे दाखले देऊन रूपालीचे काका राजेंद्र लंगोटे यांनी तुरखडे कुटुंबीयांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. रूपालीचे काका राजेंद्र लंगोटे यांच्या म्हणण्यानुसार, लग्नानंतर रूपालीला कधीही माहेरी पाठविण्यात आले नाही. माहेरी आल्यानंतर अवघ्या दोन तासांत तिला परत नेले जात असे. त्यामुळे माहेरच्या मंडळींना रूपालीचा सहवास लाभतच नव्हता. इतकेच नव्हे तर रूपालीचा नवरा सतीश यानेसुध्दा कधीही सासरी मुक्काम केला नाही. लग्नाला सहा वर्षे उलटून गेल्यानंतर तिला अमरावतीला कधीच आणले नाही. यातून रूपालीवर किती जाचक बंधने होती, हे स्पष्ट होते, असे तिच्या काकांचे म्हणणे आहे. सधन कुटुंबात असूनदेखील रूपालीला कधीही २०० रूपयांपेक्षा अधिक किमतीची साडी सासरी घेतली गेली नाही. घरातील इतर महिलांना मात्र मन मानेल तशा पध्दतीने खर्च करण्याची मुभा असताना रूपालीला तिच्या स्त्रीसुलभ इच्छा मारून जगावे लागत होते. माहेरून मिळालेल्या महागड्या साड्या वापरण्याचीदेखील तिला परवानगी नव्हती. रूपाली गृहिणी असल्याने घरातील कामे करण्याचे तिचे कर्तव्य असले तरी एखाद्या मोलकरणीसारखे तिला राबवून घेतले जात होते, असे रूपालीचे काका राजेंद्र लंगोटे यांचे म्हणणे आहे. पहाटे पाच वाजता उठून कामाला लागणाऱ्या रूपालीची उशिरा रात्रीच अंथरूणाला पाठ टेकत असे. माहेरी फोन करून लहान बहीण, भाऊ, आई-वडिलांशी बोलण्याची परवानगीदेखील रूपालीला नव्हती. रूपालीचा सर्वाधिक छळ तिची चुलत सासू चित्रा तुरखडे यांनी केल्याचा आरोपही रूपालीचे काका राजेंद्र तुरखडे यांनी केला आहे.